Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धग अजुनही कायम

जावली तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धग अजुनही कायम

;

 कुडाळ -दि.१८- भारतात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे बाबत धोक्यांची घंटा केंद्र सरकारने दिली आहे.असे असले तरीही जावली तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरीही धग कायम आहे .

      जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार  १० जुलै पासून गेल्या आठ दिवसांत तालुक्यात १४० जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तर १७२ जणांनी मात केली आहे.या आठ दिवसांत तीन कोरोना मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा २३४ झाला आहे.तालुक्यात सध्या १९२ अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page