एकूण -१२१३,डिस्चार्ज ९१६, बळी ३० , अँक्टिव्ह २७०
सूर्यकांत जोशी – जावली तालुक्यात मंगळवारी वाई येथील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कुडाळ येथील ७३ वर्षीय पुरुषाचा कोरोना मुळे मृत्यू झाला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडुन मिळाली आहे.खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची तसेच मृत्यूंची नोंद प्रशासनाकडे होण्यास वेळ लागत असल्याची बाब पुन्हा समोर येत आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे. जावली तालुक्यातील हुमगांव व कुडाळ येथील गेल्या तीन दिवसांत झालेल्या मृत्यूची नोंद अजुनही तालुका प्रशासनाकडे आलेली नाही.
दरम्यान आज जावली तालुक्यात २० जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये मेढा ३, कुडाळ ५, शिंदेवाडी ४, भोगवली १, आर्डे ३,म्हाते खुर्द २, मोहाट १, रुईघर १ अशा वीस जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
जावली तालुक्यातील ७ गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील निपाणी, करंजे तर्फ मेढा, मेढा प्रभाग ४, मोरघर, करंदी तर्फ कुडाळ,वालुथ – बामणेवाडी , या ७ गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील ७ गावात कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
प्रशासनाच्या मदतीसाठी जावलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरोना बाबतचे गांभीर्य लोकांना समजले आहे. लस येण्यासाठी अजुन किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. असा बिकट प्रसंग जनतेने या पूर्वी कधीच अनुभवला नाही. गेले सहा महिने सर्वजण या संकटाशी मुकाबला करत आहोत. प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देत आहे. ही सामाजिक बांधिलकीची असणारी जाण नक्कीच या संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
कोरोना वर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाचे निकराचे प्रयत्न सुरू होते .परंतु अन् लाँक सुरु झाल्यावर कोरोनाने रौद्र रूप धारण केले.आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना मर्यादा येऊ लागल्या. हे जाणकार सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच जाणले .आणि प्रशासना सोबत आम्ही सर्वजण असल्याचे प्रत्यक्ष क्रतीतून आज दाखवून दिले. आखाडे, मेढा सायगांव ,पुनवडी, केळघर ,यासह अनेक गावे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
कुडाळ मध्येही लोकसहभागातून आठ बेड चे कोविड सेंटर होत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.आता प्रत्येकाला माझे कुटुंब, माझी जबाबदारी समजावीच लागेल.