एकूण ; बाधित ७५९८, डिस्चार्ज ६७८५, मृत्यू १९९, अॅक्टिव्ह ६१४.
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना बाधितांच्या आकड्यांने शंभरी पार केली आहे.त्यामुळे एक तारखे पर्यंत तालुका कोरोनामुक होईल या अपेक्षांना खीळ बसली आहे.
गेले दोन महिने लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या जनतेने आता या आठवड्यात कडक लाॅकडाऊन सुद्धा डोक्यावर घेतला.परंतू कोरोना बाधितांचा वाढता आलेख मात्र खाली येत नाही.कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.बाधितांपासून होणारा सुपर स्प्रेड रोखण्यासाठी गावोगावी संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.अनेक ठिकाणी सुविधांचा अभाव आहे.त्यातूनही मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.ज्यांच्याकडे स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे .ते कोरोना बाधित संस्थात्मक विलगीकरणाला विरोध करत असल्याचे दिसून आले.लोक भावना तसेच ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणाच्या सुविधांचा विचार करुन शासनाने सुद्धा सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणाचा निर्णय मागे घेतला व सोयी पासुन विलगीकरणाची मुभा दिली.
एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी शासन, प्रशासन, सामाजिक संस्था, कार्यकर्ते जीवाचे रान करत असताना काही ठिकाणी लोकांचा नियम पायदळी तुडवत असल्याचा बेजबाबदार पणा या प्रयत्नांना खीळ घालत आहेत.हे नव्याने तयार होत असल्याच्या कोरोना साखळी तून दिसत आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि. २५ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.२६ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये १०७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ६१ जण कोरोना मुक्त झाले आहेत.तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आता ६१४ झाली आहे.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;पावशेवाडी १,आंबेघर तर्फे मेढा १,आसणी २२, भणंग १,बिभवी १,मेढा १४, ओखवडी ४,पुनवडी १,रिटकवली १, बामणोली तर्फे कुडाळ १,हुमगांव १, खर्शीबारामुरे २, कुडाळ २,महु ५,म्हसवे ४,पार्टेवाडी १,सायघर ४,कुसुंबी २,मालचौंडी १, म्हाते बु.५,निझरे ६,सायळी २,आलेवाडी २,आनेवाडी ६, बेलावडे १, सायगांव २, सोनगाव १३ एकूण १०७.