Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोना बाधितां मध्ये वाढ ; डिस्चार्ज ही शंभरी पार ;

जावली तालुक्यात कोरोना बाधितां मध्ये वाढ ; डिस्चार्ज ही शंभरी पार ;

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात गेले तीन दिवस दिलासा देणार्या कोरोना बाधितांच्या  आकड्यात शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालात पुन्हा मोठी वाढ झाली आहे.दररोज नवनवीन गावांत साखळी तयार होत असल्याने जावली तालुक्याच्या  कोरोना मुक्तीला ब्रेक लागत आहे.आज कोरोना बाधितांना आकडा वाढला असला तरीही त्यापेक्षा जास्त झालेली कोरोना मुक्ती दिलासा दायक आहे.

        जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.४. रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ८२ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज १०७ जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत.तालुक्यात अॅक्टिव्ह कोरोना बाधित ५५२ आहेत.

         आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;तेटली ३,केळघर १५,मेढा १,आखेगणी १, बामणोली तर्फे कुडाळ १, कुडाळ १,महू २,म्हसवे ३,पार्टेवाडी १,सोमर्डी १,वालूथ १,दुंद १,गांजे १,कुसुंबी १,पिंपरी तर्फे मेढा १,आलेवाडी २,आनेवाडी ६,बेलावडे ३,भिवंडी ४, इंदवली २, करंदी त.कुडाळ ८,करंदोशी २, प्रभूचीवाडी ३, सायगांव १, सर्जापूर १, सरताळे २, सोनगाव १४.एकूण ८२.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page