Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोना बाधितांसाठी आणखी सत्तर बेडची लवकरच व्यवस्था - पालक मंत्र्यांची...

जावली तालुक्यात कोरोना बाधितांसाठी आणखी सत्तर बेडची लवकरच व्यवस्था – पालक मंत्र्यांची ग्वाही

सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश  

            कोरोनाच्या गंभीर होत चाललेल्या परिस्थितीत जावली तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी जिवलग सदस्य व मी एक जबाबदार टीमच्या माध्यमातून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी   संपर्क साधुन तालुक्यात अधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली .त्याला पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

 तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी सत्तर बेड ची व्यवस्था विविध phc व ग्रामीण रुग्णालयात करणेचे त्यांनी मान्य केले व तशी व्यवस्था लवकरच उभी करणेची ग्वाही मंत्री महोदयांनी दिली आहे .अशी माहिती या अत्यंत गंभीर परिस्थितीत जनतेविषयी अत्यंत तळमळीने कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव शिंदे यांनी दिली.

          सोमनाथ  काशिलकर, शशिकांत गुरव, महेश पवार ,महेश देशमुख ,संदीप पवार व सयाजीराव शिंदे, यांनी  जिल्ह्याचे पालक मंत्री मा बाळासाहेब पाटील  यांचे शी नुकतीच चर्चा करून येत्या दहा दिवसात यासुविधा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

        मी एक जबाबदार जावलीकर तर्फे

पालकमंत्री मा .बाळासाहेब पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page