एकूण -११८९,डिस्चार्ज ९१६, बळी २९ , अँक्टिव्ह २४६
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात मंगळवारी मेढा येथील ७३ वर्षीय महिलेचा कोरोना मुळे बळी गेला असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली. दरम्यान सोमवारी हुमगांव येथील ८५ वर्षीय पुरुषाचा वाई येथील खाजगी रुग्णालयात कोरोना पाँझिटीव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती संबंधीताच्या नातेवाईकांनी दिली आहे.तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा आता २९ झाला आहे.
आज १८ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;
जावली तालुक्यातील १८ जणांचा अहवाल आज कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये
एकूण 122 स्वाब पैकी निपाणी ४,आपटी १,मेढा ५,घोटेघर १,कसबे बामणोली १,आंबेघर मेढा 2,सोनगाव १,मोरघर 3 यांचा समावेश आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
जावलीत मेढयात सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा
जावली तालुक्यात आता पर्यंत तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे सर्वाधिक २१०, बळी १,कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.त्यानंतर अनुक्रमे पुनवडी १६१ ,२ बळी, दुदुस्करवाडी ७३,१ बळी ,कुडाळ ६४,२ बळी, उंबरीवाडी ५१, सायगांव ५० , ३ बळी,या गावांत पन्नास पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत . अर्थात जे रूग्ण चौदा दिवसांपूर्वी आढळले आहेत यातील बळी वगळता सर्वानी कोरोनावर मात केलेली आहे.
तालुक्यात कोरोना बाधितांचा रिकव्हरी दर ७८.१६%,अँक्टिव्ह दर १९.५४%, मृत्यू दर २.३०%, आहे.तालुक्यातील रायगांव येथील कोविड केअर सेंटर मध्ये ५१ कोरोना बाधित दाखल आहेत.
जावली तालुक्यातील ४ गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील भणंग येथील कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या तीन ठिकाणी, केळघर तर्फ मेढा येथील महादेव मंदिर समोर चा भाग , आर्डे ,कुडाळ येथील वारागडे आळी , या ४ गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील ४ गावात कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.