सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात या आठवड्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.आज कोरोना बाधितांचा आकडा ९० वर पोहचल्याने गेल्या आठवड्याच्या उत्तरार्धात पन्नास हुन कमी आलेल्या बाधितांच्या आकड्याने पुन्हा शंभरीकडे वाटचाल सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.२४ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.२५. रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये तब्बल ९० जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज २१ जण कोरोना मुक्त झाले आहेत.अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आता ५६८ झाली आहे.आज कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे :असती २, भणंग ७,भिवडी १,केळघर ३,मेढा २,रिटकवली १, सावली १,घोटेघर २,हातगेघर १, हुमगांव १,करहर १,कावडी १, खर्शीबारामुरे ५, कुडाळ ४,महू १०,म्हसवे ३,पार्टेवाडी २,सायघर ५,शेते २,कुसुंबी १,आलेवाडी १३,आनेवाडी १,बेलावडे १,दरे खु.६, इंदवली १, खर्शी त.कुडाळ १,मालुसरेवाडी २,पवारवाडी १, रायगांव १,सायगांव १, सर्जापूर २, सरताळे १, सोनगाव ४ .एकूण ९० .