Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोना रुग्ण वाढ सुरुच

जावली तालुक्यात कोरोना रुग्ण वाढ सुरुच

कुडाळ दि. १ – जावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सुरुच आहे.दररोज नवनवीन गावांत समूह संसर्ग साखळी तयार होत असल्याचे दिसून येत आहे.

           जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.२९ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि. ३० रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ३६ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज १८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.जून महिन्यातील एका मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा २३० झाला आहे.तालुक्यात २२४अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

           आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे : आंबेघर तर्फे मेढा १७,मेढा ३, कुडाळ ४,धोंडेवाडी २, सोनगाव १०.एकूण ३६. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page