कुडाळ – वाई तालुक्या पाठोपाठ चोरट्यानी जावली तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. शनिवारी रात्री भिवडी येथील सात बंद घरे चोरट्यानी फोडून सोने व रोख रकमेवर डल्ला मारला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यानी बंद घरांचे कडी कोयंडे तोडून चोरी केली. यामध्ये किसन चव्हाण यांच्या घरातून तीन तोल्यांचे गंठण, सागर भिसे यांच्या घरातून अर्धा तोळ्याची अंगठी व रोग अठराशे रुपये चोरट्याने लंपास केले. याशिवाय बबन चव्हाण, कृष्ण राव चव्हाण, रविकांत दरेकर, भरत चव्हाण, संपतराव तरडे यांचीही घरे अज्ञात चोरांनी फोडली परंतु त्यातून त्यांच्या हाती फार काही लागले नाही. परंतु चोरट्याने घरातील सामान कपडे यांची तोडफोड व नासधुस केली.
एका घरातील कपाट चोरटे उचकटत असताना शेजारील घरातील इसमास जाग आल्याने त्याला चोरीचा संशय आला. त्याने गावातील सरपंच व पोलीस पाटील यांना य बाबत कल्पना दिल्या नंतर ग्रामस्थ घरा बाहेर आले असता काही घरांचे कडी कोयंडे तोडल्याचे दिसले. त्यानंतर सर्वाना सावध करण्यासाठी सरपंचांनी ग्रामपंचायत वरील भोंगा वाजवून धोक्याची सूचना दिली. याबाबत ची माहिती पोलीस पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर कुडाळ पोलीस दुरुक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे व सहकार्याने घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील गावातील ग्रामस्थांनाही सावध केले. संभाव्य चोरीच्या घटना टाळण्यासाठी ग्राम सुरक्षा दलांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही रात्रगस्ती वाढवणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यात सातारा जिल्ह्यात चोरीच्या अनेक घटना घडत असून सातारा पोलीस दलाचा चोरट्यावर वचक राहिला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे
एस पी साहेब कुडाळ चे सीसीटीव्ही कधी चालू करणार*
जावली तालुक्यातील कुडाळ हे सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. तीन वर्षांपूर्वी गावातील लोकांनी वर्गणी काढून गावात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली. त्या माध्यमातून पोलीस स्टेशन मधून गावातील अनेक घटनांवर पोलिसांचे लक्ष राहत होते. परंतु काही दिवसातच ही यंत्रणा बंद पडली. सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत सीसीटीव्ही सुरू करण्यात आले नाहीत. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून सीसीटीव्ही चालू करण्याबाबत विनंती केली होती. त्यावेळी सन्माननीय एस पी साहेबांनी लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सूचना देतो असे सांगितले होते. परंतु गेल्या सहा महिन्यात याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. तरी सदर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने व पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.