Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात दररोज नवनवीन गावे बनताहेत कोरोनाचा हाॅटस्पाॅट ;

जावली तालुक्यात दररोज नवनवीन गावे बनताहेत कोरोनाचा हाॅटस्पाॅट ;

जावली तालुक्यात दररोज नवनवीन गावे बनताहेत कोरोनाचा हाॅटस्पाॅट ; प्रशासनाने संसर्गाचे श्रोत तपासून कारवाई करणे आवश्यक.

एकूण ६६२३, डिस्चार्ज ५६३६, मृत्यू १५७, अॅक्टिव्ह ८३०

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुका कोरोनातून बाहेर पडेल असे दिसत असतानाच दररोज नवनवीन गावांत कोरोनाची साखळी तयार होत असल्याचे दिसून येत आहे.प्रशासनाने अशा कोरोना संसर्ग साखळीचा श्रोत पाहून नियमबाह्य काही होत असल्यास कडक कारवाई करावी अशी अपेक्षा जावलीतील जनतेतून होत आहे.

               जावली तालुक्यातील जनता शिस्तप्रिय आहे.आज पर्यंत तालुक्यात शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.तसेच कोरोना काळात प्रशासनाचे आदेशांचे पालन करत आहेत.परंतू काही लोकांमुळे जर सर्वांना त्रास होणार असेल तर कडक कारवाई आवश्यकच आहे असा सूर उमटत आहे.

        जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.११ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.१२ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ८३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. यामध्ये म्हाते बु. येथील २३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ७३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

          आजच्या अहवालात कोरोना बाधित गाव निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; धेन २,कास २,माजरे शेंबडी २,आगलावेवाडी १,बोंडारवाडी १,चोरांबे १, जवळवाडी १,केळघर ३,कुरळोशी ६,मेढा ८,रेंगडी १,रिटकवली १,वरोशी १, बामणोली तर्फे कुडाळ १, हातगेघर ६, हुमगांव १, कुडाळ १, पिंपळी ३,रुईघर १, सोमर्डी १,म्हाते बु.२३, आनेवाडी ३, बेलावडे २,बिभवी १, दरे खु.३,मोरघर १,रायगांव १, सायगांव ४,सरताळे १, एकूण ८३.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page