सूर्यकांत जोशी कुडाळ – नेवेकरवाडी या.जावली येथे आज आणखी १९ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.यामध्ये दहा वर्षांच्या आतील चार मुलांचा समावेश आहे.या गावातील एकूण कोरोना बाधितांना आकडा आता १०४ झाला आहे.यामध्ये सर्वांची प्रकृती चांगली आहे.आरोग्य विभाग परिस्थिती वर पूर्ण लक्ष ठेवून आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
तालुक्यात दि.१७ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि. १८. रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ३७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.१८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.आज एका मृत्यूची नोंद झाली असून एकूण कोरोना मृत्यूचा आकडा २२३ झाला आहे.तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या २९५. झाली आहे.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; मेढा २,करहर १,वरोशी १,पानस १,वागदरे १,आनेवाडी ३, इंदवली २,खर्शी तर्फे कुडाळ १, मार्ली १,नेवेकरवाडी १९, सोनगाव ५ एकूण ३७.