जावली तालुक्यात मोकाट फिरणारे पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न ; सुपर स्प्रेडरांची विलगीकरण कक्षात रवानगी
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज विनाकारण मोकाट फिरणाऱ्या ३२ जणांवर मेढा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.याच बरोबर त्यांची कोरोना चाचणी केली असता सायगांव विभागातील पाच जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला. कोरोनाचे सुपरस्प्रेडर असणार्या या पाचही जणांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे पीएसआय कदम यांनी दिली.
जावली तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.याला मेढा पोलिसांची चांगलीच जोड मिळाली आहे. मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने , कुडाळ दूरक्षेत्राचे पीएसआय कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी या आठवड्यात नाकाबंदी करुन विनाकारण रस्त्यावर फिरणारांवर कारवाईचा धडाका लावला आहे.आज पोलिसांच्या जागरुकते मुळे कोरोनाचे पाच सुपरस्प्रेडर निदर्शनास आले.याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले.सपोनि अमोल माने संपूर्ण तालुक्यात फिरुन मोकाट फिरणाऱ्या लोकांना घरात थांबण्याचे आवाहन करत आहेत.