जावली तालुक्यात मंगळवार पासून सात दिवस कडक जनता कर्फ्यु
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्णय
जावली तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून अनेक गावात कोरोना रुग्ण सापडत आहेत तालुक्याच ठिकाण असलेल्या मेढा नगरीतही कोरोनाने दीड शतक पार केले आहे तालुक्यातील ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवार दि ८ सप्टेंबर ते सोमवार दि १४ सप्टेंबर पर्यंत पूर्ण तालुक्यात कडक जनता कर्फ्यु पाळण्याचा लोकांनी लोकांसाठी निर्णय घेतला आहे कोरोनाची दाहकता वाढली असून बेड मिळत नाहीत म्हणून नागरिकांनी आणि व्यापाऱयांनी सहकार्य करून कडक बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे
तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते,व्यापारी,पदाधिकारी, सरपंच व अधिकारी,पत्रकार यांच्या आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला या सात दिवसाच्या बंद मुळे व्यापाऱयांचे नुकसान होणार असले तरी सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बंद पाळणे आवश्यकच आहे संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यांना बेड उपलब्ध होत नाहीत ज्यांच्यावर वेळ येतेय त्यांनाच त्याची दाहकता कळत आहे कोरोनाची ही साखळी तोडणे आवश्यक आहे मात्र त्यासाठी बंद पाळणे हाच पर्याय असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले
तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये या जनता कर्फ्युची कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे प्रशासनही सहकार्य करणार असून व्यापाऱयांनी लोकहितासाठी हा बंद पाळावा फक्त दवाखाने आणि मेडिकल दुकानांना यातून सूट देण्यात आली आहे भाजीपाला दूध ही बंद ठेवण्यात येणार आहे सात दिवस कडक बंद पाळला तर निश्चित कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल तालुक्यातील मेढा,केळघर,कुडाळ,करहर,आनेवाडी,सायगाव या बाजारपेठ असलेल्या गावानी सहकार्य करून बंद यशस्वी करावा मेढ्यात सध्या लॉक डाऊन सुरू असल्याने नागरिक जवळच्या गावातील बाजारपेठेत जाऊन खरेदी करत आहेत त्यामुळं संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे
आता कराड,वाई,व अनेक गावातील व्यापाऱयांनी स्वयंसपूर्तीने लॉक डाऊनचा निर्णय घेतला आहे त्याच पद्धतीने जावली तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी व कोरोनाची वाढणारी साखळी तोडण्यासाठी सात दिवस तालुक्यातील सर्व व्यापाऱयांनी कडक बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे हा लोकांनी लोकांसाठी घेतलेला निर्णय आहे .
जावली तालुक्यात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाचे कोणतेही अधिक्रत आदेश नाहीत.
जनतेने आपल्या साठी घेतलेला हा कडक कर्फू निर्बंधचा निर्णय खूपच उपयुक्त आहे .तो यशस्वी व्हावा आणि कोरोना सांखळी तुटून जावली तालूक्यातून ही महामारी हद्दपार व्हावी ही प्रभु चरणी प्रार्थना !!धन्यवाद !!! महादेव पवार ,पुणे .