Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात शनिवारी एकाचा कोरोना मुळे मृत्यू;आज ८८ जणांचे कोरोना अहवाल

जावली तालुक्यात शनिवारी एकाचा कोरोना मुळे मृत्यू;आज ८८ जणांचे कोरोना अहवाल

 जावली तालुक्यात शनिवारी एकाचा कोरोना मुळे मृत्यू;

आज ८८ जणांचे कोरोना अहवाल प्रतिक्षेत

    एकूण – ११२३ , बळी २६ , डिस्चार्ज ८०७ ,अँक्टिव्ह २९०

सूर्यकांत जोशी कुडाळ – सोनगांव तालुका जावली येथील एका ५५  वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू   झाला असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

        याबाबत सोनगांव येथे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेची तब्येत बिघडल्याने मेढा ग्रामीण रुग्णालयात नेहण्यात आले होते. त्या ठिकाणी कोरोना टेस्ट केली असता ती पाँझिटीव्ह आल्याने पुढील उपचारासाठी सातारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेहण्यात आले.परंतु त्या ठिकाणी दोन तास व्हरांड्यात थांबूनही बेड उपलब्ध न झाल्याने उपचारा अभावी रुग्णालयातच या महिलेचा मृत्यू  झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

            प्रशासनाच्या आकडेवारी नुसार तालुक्यातील कोरोना बळींची संख्या २६ वर पोहचली आहे.दरम्यान शक्रवार दि.११ रोजी जिल्हा माहिती कार्यालयातून प्रात झालेल्या अहवालात तालुक्यातील मोरघर व सायगांव येथील व्यक्तींचा कोरोना बळी गेल्याची माहिती नमूद करण्यात आली होती. त्यानुसार विविध प्रसार माध्यमातून  वृत्त  प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासन व आरोग्य विभागाने या दोन्ही गावात कोरोना बळीं बाबत चौकशी केली. परंतु असा कोणीही बळी गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या कडुन प्राप्त अहवाला नुसार माहिती प्रसिद्ध केल्याने याबाबत संभ्रम आहे.

        खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेले  कोरोना बाधित तसेच  झालेल्या मृत्यूची नोंद प्रशासनाकडे तात्काळ होत नाही.असे दिसून येत आहे.

आज ८८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत

      जावली तालुक्यातील ८८ जणांच्या स्वाबचे  अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले नाहीत.तालुक्यात आर्डे, शिंदेवाडी,सरताळे, म्हसवे माची,थोरली काळोशी, म्हाते खूर्द, मेढा, आंबेघर तर्फ मेढा या गावात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

जावली तालुक्यातील ९ गावात आज  कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

       जावली तालुक्यातील शिंदेवाडी, मेढा येथील प्रभाग १० व १४,म्हाते खुर्द, सोनगांव, सरताळे,म्हसवे माची,आंबेघर तर्फ मेढा,आर्डे व काळोशी थोरली या ९  गावात  ११  ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील ९ गावात कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी  निर्धारित नियमानुसार  कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page