छूपे यात्रा, वाढदिवस,लग्न सोहळे कारणीभूत ठरताहेत का.
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज सलग तिसऱ्या दिवशी १०४ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. आज २९७ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.तालुक्यातील घोटेघर येथे दि.९ रोजी अॅन्टीजेन टेस्ट मध्ये तब्बल ३० कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. बाजारपेठा, दुकानं बंद आहेत.बाहेर फिरण्यावर निर्बंध घातले आहेत.तरीही कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे.सध्या गावोगावी यात्रा सुरू आहेत.धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आहेत.परंतू कोंबड्या आणि बकर्यांची गावोगाव मोठ्या कत्तल होत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे यात्रा, वाढदिवस, लग्न यासह विविध प्रकारच्या सोहळ्यानिमित्त छूप्या पद्धतीने होणारे सेलिब्रेशन तर कारणीभूत ठरत असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.८ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.९ घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये १०४ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.घोटेघर येथे रविवारी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये तब्बल तीस जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. याशिवाय भणंग २,बिभवी १, जवळवाडी ७,केडंबे १,केळघर २,केंजळ ६,कुरळोशी १,मामुर्डी ३,मेढा २४,ओझरे १,रिटकवली २,आखेगणी १, बामणोली तर्फे कुडाळ १,हुमगांव ३, कुडाळ ४,महू ४,म्हसवे १,पिंपळी १,रुईघर २,मालचौंडी २,मोहाट ३, एकीव १,आर्डे १.या गावांतील रुग्णांचा समावेश आहे.