Homeसामाजिकजावली तालुक्यात हर घर तिरंगा फडकणार -आ. शिवेंद्रसिंहराजे

जावली तालुक्यात हर घर तिरंगा फडकणार -आ. शिवेंद्रसिंहराजे

सूर्यकांत जोशी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते भाजपा जावली कडून तिरंगा ध्वजाचे वाटप.
मेढा तालुका जावली येथे भारतीय जनता पार्टी यांचे वतीने कार्यसम्राट आमादार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे संकल्पनेतून संपूर्ण जावली तालुक्यातील प्रत्येक गावोगावी भाजपा बुथअध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकाऱ्यांचे मार्फत भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा स्वातंत्र्याच्या अमृत माहोत्सवानिमित्त मोफत वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज मेढा येथे करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे , सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा गीताताई लोखंडे ,भाजपा नगरसेवक विकास देशपांडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्र क्षिरसागर,शहराध्यक्ष विनोद वेंदे, मोहन कासुर्डे, यांची प्रमुख उपस्थितीत होती.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य महोत्सवास प्रत्येक नागरीकांना आपापल्या घरी, कार्यालयावर , सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज तिरंगा नियमांचे पालन करून फडकवण्यास प्रथमच परवानगी दिल्यामुळे नागरिकांमध्ये खूपच उत्साह वाढला असून , मोठ्या अभिमानाने प्रत्येकाने या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन जावलीकरांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. सदर कार्यक्रम हा कोणत्याही एका पक्षाशी निगडीत नसून , सर्वच भारतीयांनी यात सहभाग नोंदवला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी , सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आदी हजारो राष्ट्रभक्तांच्या आत्मबलीदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस असून , प्रत्येकाने राष्ट्रभक्तांच्या त्यागाची जाणीव ठेऊन स्वाभिमानाने तिरंगा नियमांचे पालन करून १३ ते १५ आँगस्ट पर्यत घरोघरी , कार्यालयावर, सार्वजनिक ठिकाणी फडकवावा.
तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर घरोघरी राष्ट्रध्वज पोहचवून हर घर तिरंगा अभियान यशस्वी करावे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेला कार्यक्रम सर्वांनीच यशस्वी करावा असेही आवाहन केले.
तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी प्रस्तावना केली. सुत्रसंचालन नगसेवक विकास देशपांडे यांनी केले तर शहर अध्यक्ष विनोद वेंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस प्रविण गाडवे, विनायक पुसेगावकर, उपाध्यक्ष किरण भिलारे, जितेंद्र पवार, भानुदास ओंबळे ,गणेश पार्टे, महिला अध्यक्षा वैशाली सावंत,सुरेंद्र पंडीत,शिवराम शेटे,धनंजय खटावकर,नगरपंचायत चे अधिकारी सचिन घाटुळे,आशिष कुंभार,संजय सपकाळ,मुंकुद पिटके,सुरेश देशमुख,
सोनिया धनावडे, प्रदिप बेलोशे, रोहीत नवसरे, रामचंद्र शेलार, बबन शेलार, स्वप्निल ननावरे, देवेंद्र राजपूरे आदी पदाधिकारी व बहुसंख्य नागरीक यावेळी उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular