जावली तालुक्यात आज फक्त बारा जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह
कुडाळ -दि.६. जावली तालुक्यात गेल्या तीन महिन्यांतील सर्वात कमी कोरोना बाधितांची नोंद आहे.शुक्रवारी रात्री ८२ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला होता.परंतू शनिवारी रात्री केवळ बारा जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.हा एक जावली करांना कोरोनाचा सुखद धक्का म्हणावा लागेल.कदाचित हा विकेंड दिलासा असू शकतो. त्यामुळे सावध रहाणेचं हितावह आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि. ३ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि. ५ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये १२ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. आज ४१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.तालुक्यात ५२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; तेटली १, चोरांबे १, केळघर १,ओझरे १,म्हसवे १,रांजणी १,आनेवाडी ५,सायगांव १.एकूण १२.
