HomeTop Newsजावली तालुक्याला दिलासा- पाच गावांचे प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध शिथिल

जावली तालुक्याला दिलासा- पाच गावांचे प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध शिथिल

जावली तालुक्यासाठी दिलासा दायक बातमी

जावली तालुक्यातील कन्टेमेंट झोन मधील पाच गावांतील निर्बंध शिथील – मिनाज मुल्ला

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कोरोना मुक्त झालेल्या पाच गावातील कन्टेमेंट झोन मधील निर्बंध शिथील करण्यात येत असून या गावांना यापुढे जिल्हाधिकारी सो.सातारा यांनी कन्टेमेंट झोन शिवाय अन्य गावांना असणाऱ्या अटी शर्थी लागू होतील असा आदेश उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी जारी केला आहे.यामुळे या पाच गावातील ग्रामस्थांसह सर्व तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

              तालुक्यातील वरोशी  २ पैकी १ मयत , ,केळघर- नांदगणे  ६ ,सायगांव २ ,मोरघर ४ ,सावरी ६ असे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले होते. त्यानंतर  शासनाच्या नियमानुसार जावलीचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या विनंती पत्रा नुसार यागावांना कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु या गावांत आढळलेल्या कोरोना रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली.त्यानंतर या रुग्णांचा होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला.तसेच यागावांत शासनाच्या नियमानुसार निर्धारित दिवसात कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण न आढळल्याने या पाचगावातील  कन्टेमेंट झोनचे निर्बंध शिथिल करण्याची शिफारस तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी वरोशी, केळघर- नांदगणे,सायगांव, मोरघर व सावरी या पाच गावातील कन्टेमेंट झोनचे निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular