सूर्यकांत जोशी कुडाळ -आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी भाजपा तालुका कार्यकारिणीच्या वतीने तहसील कार्यालय मेढा येथे तालुक्यामध्ये सेतू केंद्र सुरु करणे, विद्यार्थी आणि सर्वांचे दाखले वेळेवर मिळणे, पाणंद रस्ते खुले करणे यासाठी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. एम एस ई बी या ठिकाणी नवीन मीटर मुले होणाऱ्या त्रासाबद्दल कल्पना देऊन सदरचे मीटर बसवू नयेत याबाबतचे निवेदन दिले. मेढा एस टी डेपो याठिकाणी डेपो मॅनेजर यांचेशी चर्चा करून मुक्कामी गाड्या, त्याचबरोबर वेळेवर गाडी न येण्यामुळे प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे होणारे हाल याबाबत चर्चा करून त्यामध्ये सुधारणा करणे संबंधी सूचना देऊन निवेदन देण्यात आले याप्रसंगी भाजपा मंडळ अध्यक्ष संदीप परामने आणि मारुती चिकने, माजी नगरसेवक विकास देशपांडे, उपाध्यक्ष विकास धोंडे, दत्तात्रय वारागडे, सुरेंद्र पंडित, वाहतूक आघाडी अध्यक्ष अमोल भिलारे , व्यापार आघाडी अध्यक्ष संतोष महामुलकर, नामदेव नेवेकर, सुनील धोंडे,सचिन महामुलकर, रामदास गलगले, गीताताई लोखंडे, दत्ता पार्टे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
जावली भाजप कार्यकारिणी ऍक्टिव्ह मोडवर : नागरी सुविधा जलद व सुलभ मिळण्यासाठी प्रशासनाला अल्टीमेटम
0
286
RELATED ARTICLES
- Advertisment -