. जावली महाबळेश्वर बाजार समितीला सर्वतोपरी सहकार्य करणार -आ. शिवेंद्रसिंह राजें
कुडाळ – जावली महाबळेश्वर बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक मंडळ मोठ्या जोमाने व एकोप्याने काम करत आहेत. बाजार समितीच्या सर्वांगीण प्रगती साठी संचालक मंडळ नवीन उपाय योजना करत आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील असे प्रतिपादन आ. श्री. छ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी केले.
जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र राजपुरे, संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे,माजी शिक्षण सभापती अमित कदम, माजी सभापती बाबुराव संकपाळ,उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजें म्हणाले, बाजारसामितीच्या निवडणुकीत ज्या प्रमाणे सर्वांनी पक्ष विरहित एकजूट दाखवली त्या प्रमाणेच सर्व सहकारी संस्था चालवण्या साठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी विक्रीचे व्यवहार आपल्याला वाढवायचा आहे. .संचालक मंडळाच्या माध्यमातून बाजार समितीच्या माध्यमातून विविध उपाय योजना राबवण्यात येत आहेत. सर्वांच्या सहकार्याने नियोजित इमारत, गाळे, महाबळेश्वरच्या जागेचा विषय , पेट्रोल पंप किंवा आपल्या जावली दूध डेरीच्या जागेचा विषय असेल त्यासाठी सर्वांना आपण चांगल्या पद्धतीने शासनाकडून जे काही सहकार्य लागेल ते देऊन आपली मार्केट कमिटी वाढेल कशी मोठी कशी होईल आणि उत्पन्न मार्केट कमिटीला वाढवता कसा येईल यासाठी प्रयत्न केले जातील.
प्रतापगड कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करणार आहोत. अजिंक्य तारा कारखाना भागीदारी तत्वावर प्रतापगड कारखाना चालवणार आहे. कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहिल. कोणताही राजकीय हेतू न ठेवता सगळ्या उसाच्या नोंदी आपण घेतलेल्या आहेत. कोणतेही गट तट पाहिले नाहीत.सगळ्यांनी एकत्र येऊन प्रतापगड कारखाना यशस्वी चालवूया असे आवाहन आ.शिवेंद्रसिंह राजेंनी केले.महू हातगेघर धरणाच्या कालव्याची कामे पूर्ण करून आपल्याला शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी कसे लवकर नियोजन होईल त्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू कुठलीही अडचण त्याच्या येणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडेच जलसंपदा खाते आहे त्यामुळे जसं बोण्डरवाडीचा धरण प्रश्न मार्गी लावला तसाच महू हातगेघर धरणाचा अंतिम टप्पा आलेला प्रश्न आहे. तोही मार्गी लागेल.असे आ. शिवेंद्रसिंह राजेंनी यावेळी सांगितले.
वसंतराव मानकुमरे म्हणाले, जावली तालुक्याची अर्थ वाहिनी असलेली जावली सहकारी बँक आता प्रगती पथावर आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखाना आ. बाबाराजेंच्या प्रयत्नाने सुरु होत आहे. गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला बोण्डर वाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. महू हातगेघर धरणाचे पाणी लवकरच आपल्या शेतात येईल. आता बाजार समिती प्रगतीच्या दिशेने नवनवीन उपाय योजना करत आहे. त्यामुळे आगामी काळात जावली तालुक्याचा काया पालट होणार आहे.
अमित कदम म्हणाले बाजार समितीचे हित लक्षात घेऊनच तिन्ही आमदारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. संचालक मंडळ करत असलेल्या प्रयत्नांना आमचे सदैव सहकार्य राहिल.
महू व हातगेघर धरणाच्या कालव्यांची कामे त्वरित पूर्ण न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी उप सभापती रवींद्र परामणे यांनी यावेळी दिला.
जयदीप शिंदे यांनी प्रास्ताविक करून बाजार समितीची आर्थिक स्थिती आणि नियोजित उपाय योजणांची माहिती दिली.जावली महाबळेश्वर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात जावली तालुक्यातील 151 व महाबळेश्वर तालुक्यातील 111 गावांचा समावेश आहे. बाजारसमितीचे सध्या वार्षिक उत्पन्न ,20 लाखाचे आहे ते 50 लाख रुपया पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे. असे सभापती जयदीप शिंदे यांनी सांगितले.
राम शेलार व सुरेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापक महेश देशमुख यांनी अहवाल वाचन केले. संचालक मछिंद्र मुळीक यांनी सूत्रसंचालन केले.
आभार व्हा. चेअरमन हेमंतराव शिंदे यांनी मानले.
