Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावळीत 65 वर्षाच्या वृध्दाचा 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार -

जावळीत 65 वर्षाच्या वृध्दाचा 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार –

जावळीत 65 वर्षाच्या वृध्दाचा 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार –
बलात्काराचा गुन्हा दाखल करून मेढा पोलिसांकडून एकास अटक

कुडाळ ता. 16 – जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी येथील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले असल्याची घटना कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ वय – 65 वर्षे राहणार नेवेकरवाडी ता.जावळी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
मेढा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, आरोपीने पीडित मुलगी हीस हाताने ईशारा करून हिकडं ये असे म्हणाल्याने पीडित मुलगी आरोपीकडे गेली असता आरोपीने पीडितेस चल असा म्हणाला असता पीडित मुलगीने नकार दिला तेव्हा आरोपीने पीडितेच्या डाव्या हाताला धरून जबरदस्तीने जवळील शेतातील छपरात नेले त्या वेळी पीडित मुलीची मैत्रीण तेथून पळून गेली तेव्हा आरोपी बबलिंगने पीडित मुलीस छपरात नेऊन तिथं तिच्याशी बळजबरी केली, तसंच नको त्या ठिकाणी त्याने तिला स्पर्श केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी जोरजोरात ओरडल्याने आरोपी तेथून पळून गेला त्यानंतर पीडित मुलीच्या आज्जीच्या तक्रारीवरुन नराधम वृध्दा विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नमूद गुन्हयामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल माने अधिक तपास करित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page