Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सौरभ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सौरभ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नागरी बॅंक व नागरी/ग्रामीण सह.पतसंस्था यांचा प्रतिनीधी म्हणून कुडाळ ता.जावली येथील माजी आमदार कै.लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

             सौरभ शिंदे यांचे आजोबा माजी आमदार कै.लालसिंगराव शिंदे,प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कै. राजेंद्र शिंदे व त्यांच्या पश्चात श्रीमती सुनेञा शिंदे यांनी सोसायटी मतदार संघातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधित्व केले होते.तालुक्यातून सोसायटी मतदार संघातून आ. शशिकांत शिंदे इच्छुक आहेत.तर आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी तसेच  जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .त्यामुळे जावली तालुक्यातून सोसायटी मतदार संघात अधिक चुरस निर्माण झाली आहे.

          नागरी बॅंक व नागरी/ग्रामीण सह.पतसंस्था यांचा प्रतिनीधी या सुरक्षित मतदार संघातून सौरभ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी काॅंग्रेस व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पॅनलच्या माध्यमातूनच आपण निवडणूक लढवणार असल्याचे सौरभ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

             राजकारणात जिल्हा बॅंक म्हणजे लोण्याच्या गोळ्या प्रमाणेच असल्याचे बोलले जाते.या लोण्याच्या गोळ्यावर आपला हक्क रहावा यासाठी पक्षिय व व्यक्तीगत मतभेद , वादविवाद बाजुला सारुन सोयीने कशा तडजोडी केल्या जातात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.त्यामुळे या निवडणुकीकडे राज्यासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page