Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजिल्हा बॅंकेने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी तातडीने मुदतवाढ द्यावी : शेतकऱ्यांची...

जिल्हा बॅंकेने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी तातडीने मुदतवाढ द्यावी : शेतकऱ्यांची मागणी

सूर्यकांत जोशी कुडाळ ;

जावली, महाबळेश्वर  तसेच कोरेगाव सह सातारा तालुक्यात स्टॉबेरी पिकासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंके मार्फत विकास सेवा सोसायटी शेतक-यांना कर्ज पुरवठा केला जातो त्याची कर्जपरतफेड 31 मे पुर्वी करणे बंधनकारक आहे. परंतु मा. जिल्हधिका-यांनी सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला असुन या लॉकडाऊन कालावधीत सहकारी बँका बंद ठेवण्यात येणार असलेने शेतक-यांना कर्जपरतफेड करणे मुश्किल झाले आहे. तसेच सातारा   जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने नियमीत कर्जफेड करणा-या शेतक-याना लाईफ इन्शुरन्स योजना लागु केली आहे. लॉकडाऊन मुळे बँका बंद, वाहतुक व्यवस्था बंद संचारबंदी यामुळे शेतक-याना इच्छा असुनही कर्ज परतफेड करता येणार नाही त्यामुळे बँकेच्या योजनेचा  तसेच व्याजावरील सवलतींचा  लाभ घेता येणार नाही तरी या शेतक-यांना  कर्जपरतफेड मुदतवाढ देणे बाबत  जिल्हा बँकेचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी सो यांनी विचार करावा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page