Monday, April 6, 2026
HomeTop Newsजीवनमित्र फाउंडेशन मेढा यांचे नावाला साजेसं व आदर्शवत कार्य सर्वांसाठी दिशादर्शक:तहसीलदार ...

जीवनमित्र फाउंडेशन मेढा यांचे नावाला साजेसं व आदर्शवत कार्य सर्वांसाठी दिशादर्शक:तहसीलदार शरद पाटील

तहसीलदार शरद पाटील यांच्या कडे आँक्सिजन मशीन सुपुर्द करताना जीवनमित्र फाउंडेशन चे कार्यकर्ते

.सूर्यकांत जोशी कुडाळ –  सध्या कोरोनाच्या संकंटसमयी सामाजिक भान ठेवून जीवनमित्र फाउंडेशन ने केलेले कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे.असे गौरवोद्गार जावलीचे तहसीलदार शरद पाटील यांनी काढले .

          सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या पेशंटस् च्या संख्येने सरकारी व खाजगी हाँस्पीटलस् मध्ये रुग्णांना बेड नाहीत.आँक्सीजनची गरज असणाऱ्या पेशंटस् ना आँक्सीजन बेड अभावी प्राण गमवावे लागत आहेत.ग्रामीण भागामध्ये तर या सुविधा उपलब्धच होत नाहीत.त्यामुळे जावली तहसीलदार श्री शरद पाटील यांनी जावली तालुक्यामधील सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांना मदतीचे आवाहन केले होते.

तहसीलदार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जीवनमित्र फाउंडेशन मेढा यांनी जेष्ठ सहकारी कै.भानुदास देशमुख (आप्पा ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पोर्टेबल आँक्सीजन काँन्सट्रेटर मेढा ग्रामीण रूग्णालयास भेट दिले.

        गटविकास अधिकारी सतिश बुद्धे व वैद्यकीय अधिकारी डाँ.भगवान यादव यांनी जीवनमित्र फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

          जीवनमित्र फाउंडेशनने दिलेल्या मशीनमुळे जावली तालुक्यामधील रूग्णांची चांगली सोय झाली आहे व या माध्यमातून  एका तरी व्यक्तीचे प्राण वाचले तर आमचा हेतू साध्य होईल,असे सोमनाथ काशिळकर यांनी यावेळी सांगितले.

         हे आँक्सिजन मशीन मेढा येथे मा.तहसीलदार व कै.भानुदास देशमुख यांचे चुलते मन्याबापु देशमुख यांच्या हस्ते ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ.यादव यांच्याकडे सुपुर्त केले.या प्रसंगी जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  सतिश बुद्धे,जीवनमित्र फाउंडेशन चे संस्थापक सोमनाथ काशिळकर,खजिनदार सुहास पाटील,शरद रांजणे,रफिक शेख,ज्ञानेश्वर वेंदे गुरूजी व इतर मान्यवर उपस्थित होते.शरद रांजणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page