
कुडाळ -फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांचेकडून गुन्ह्यातील दोन ट्रॅक्टर सह एकुन-९,१५,०००/- रूपयांचा १००% मुद्देमाल जप्त करण्यास मेढा पोलिसांना यश आले.
याबाबत पोलीस ठाण्यातून सविस्तर मिळालेली माहिती अशी कि,दि.१६/८/२०२४ रोजी फिर्यादी अजित मोहन दुदुस्कर वय ४० वर्षे, शेती रा. मोरेवाडी पो. दरेखुर्द ता.जावली जि.सातारा यांचे नावावर असलेला महेंद्रा कंपनीचा ओजा २७ एच.पी. ट्रॅक्टर क्र.एम.एच.११ डी.एन.२३३७ ट्रॅक्टर इसम नामे अजय संतोष चव्हाण रा.सरताळे ता.जावली जि. सातारा याने फिर्यादी यांचेकडून ट्रॅक्टरचे हप्ते भरण्याची नोटरी करुन देवून सदर ट्रॅक्टरचे हप्ते न भरता तो ट्रैक्टर दुस-याच कोणाला तरी देवून फिर्यादी यांचा विश्वासघात करुन फसवणुक केली आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील साक्षीदार श्री. दत्तात्रय रामचंद्र चव्हाण रा. म्हसवे ता. जावली जि. सातारा यांचा कॅप्टन कंपनीचा २८३ ४WD मॉडेलचा ट्रॅक्टर क्र. एम.एच.११ डी.ए.५२०६ असा असलेला ट्रैक्टर फसवणूक करून घेवुन गेला असलेबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून दिनांक २६/०१/२०२६ रोजी मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १७/२०२६ भा.न्या.सं.का.२०२३ चे कलम ३१८(४),३१६ (२) प्रमाणे दाखल करणेत आलेला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांनी गुन्ह्याचे अनुशंगाने मार्गदर्शन करून आरोपीस गुन्ह्यात अटक करून त्याचेकडून फसवणुक झालेले व्यक्तींचे ट्रॅक्टर गुन्ह्याचे तपासकामी जप्त करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्याअनुशंगाने सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान गुन्ह्यातील आरोपी नामे अजय संतोष चव्हाण वय-२३ वर्षे, रा.सरताळे ता. जावली जि.सातारा यास दिनांक १७/०२/२०२६ रोजी ०१.२९ वाजता अटक करणेत आलेली असून त्यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो, मेढा यांचे समक्ष हजर ठेवले असता त्याची दिनांक-२१/०२/२०२६ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. पोलीस कस्टडी कालावधीमध्ये त्याचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपुस करता त्याने फिर्यादी व साक्षीदार यांचा ट्रैक्टर कांतीलाल अर्जुन होन रा.साई सिटी श्रीराम पार्क सी/१९ कोपरगाव जि. अहिल्यानगर यांना दिलेले होते. सदरचे दोन ट्रैक्टर १) महेंद्रा कंपनीचा ओजा २७ एच.पी. ट्रॅक्टर क्र.एम.एच.११ डी.एन.२३३७ (किंमत ५,९५,०००/- रूपये), २) कॅप्टन कंपनीचा २८३ ४WD मॉडेलचा ट्रॅक्टर क्र. एम.एच.११ डी.ए.५२०६ (किंमत ३,२०,०००/- रूपये) हे पंचनामा करून गुन्ह्यातील फसवणुक झालेले सदरचे दोन्ही ट्रॅक्टर एकुण किंमत-९,१५,०००/- रूपये अशी असलेले १००% मुद्देमाल आरोपीकडून गुन्ह्याचे तपासामध्ये जप्त करणेत आलेले आहेत.
सदर कारवाई मध्ये मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर पाटील सहा. पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रमोद निकम, पो.कॉ. सनी काळे, पो.कॉ. सूरज वाघमळे, पो.कॉ. सुनिल वाघमळे, पो.कॉ. ओंकार दिक्षीत, पो.कॉ. ओंकार चव्हाण, पो. कॉ. अजय गुरव यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला आहे. मा. श्री.तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक, मा.सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी सदर कारवाई मध्ये सहभागी अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.