सूर्यकांत जोशी कुडाळ – मेढा ते पाचवड रस्त्यालगत सरताळे ता. जावळी येथे टेली साेनिक नेटवर्क पुणे या कंपनीने बेकायदेशीर व नियमबाह्य व मनमानी पध्दतीने खोदाई करून लोकांच्या विषेशत; वाहन चालकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याबद्दल व सार्वजनिक मालमतलेचे नुकसान केल्याबद्दल कंपनीवर तसेच या कंपनीच्या ठेकेदाराला पाठीशी घालणारे जावली तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंत्यां वर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा .अशा आशयाचा तक्रार अर्ज शिवउद्योग समुहाचे जिल्हाध्यक्ष संदीप पवार व सहकार्यानी मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि.अमोल माने यांच्या कडे दिला आहे.
सदर कंपनीच्या माध्यमातून रस्त्यालगत नियमबाह्य पद्धतीने आॅप्टीकल केबल टाकण्यासाठी रस्ता खोदाई सुरू आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे फोटोसहित निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेवून संबंधित विभागाचे उप अभियंता इनामदार यांनी या कंपनीवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करने गरजेची होते परंतू आज अखेर या कंपनीवर कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही .सदर कंपनीवर कारवाई करण्यास टाळा टाळ करण्यात येत आहे, संबंधित विभागाची सदर कंपनीवर एवढी मेहरनजर का असा सवाल या निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे.
असे अवैध काम सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कडून झाले तर तात्काळ कारवाई केली जाते.मात्र टेलिसाेनिक नेटवर्क कंपनीवर कारवाई करण्याबाबत बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतली आहे . उपविभाग अभियंता यांची ही कृती या कंपनीच्या बेकायदेशीर कामाला प्रोत्साहन दिल्या सारखी आहे.
शासनाच्या आर्थिक हितसंबधाचे रक्षण करणे सार्वजनिक मालमतेचे नुकसान होवू न देणे. कोणीही. कायदा भंग करित असेल तर त्यास प्रतिबंध करणे हे या अधिकान्याचे कर्तत्व आहे. लोकसेवकाने कायदायी अवज्ञा करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सहाय्य करणे हा कायदेशीर अपराध आहे. तरी संबंधित अधिकारी व तसेच टेली सोनिक नेटवर्क पूणे या कंपनीच्या संबंधित ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी.असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.