Sunday, April 5, 2026
HomeTop News....तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बॉम्ब फोडणार ....*

….तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बॉम्ब फोडणार ….*

कुडाळ – जावली तालुक्यात सध्या असलेल्या खड्ड्यांचा विषय विविध सामाजिक संघटना तसेच युवक वर्गाने चांगलाच मनावर घेतला आहे .या खड्ड्यांचा माध्यमातून होत असणारे अपघात , महिला ,माता-भगिनी तसेच वृद्ध,  ज्येष्ठ यांना होत असलेल्या शारीरिक त्रास यामुळे संतप्त जावळीकर यांनी रस्त्यावर येण्यास सुरुवात केली आहे . येत्या दिवाळी पूर्वी रस्त्यावरील खड्डे न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडला जाईल असा इशारा जावली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

    आज कुडाळ मधील युवकांनी रस्त्यावर येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने हाय हाय च्या घोषणा दिल्या .

 त्याच बरोबर या खड्ड्यांची त्वरित भरणी झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन *सुतळी बॉम्ब* फोडून अधिकाऱ्यांच्या कानामध्ये या आंदोलनाचा आवाज घुमवणार असल्याची  प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेश पवार राहुल ननावरे व युवक वर्गाने दिली .

        तालुक्यातील जबाबदार लोकप्रतिनिधींनी सुद्धा याबाबत गांभीर्याने लक्ष घालावे.आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्यात याव्यात अशी अपेक्षा आंदोलकांच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page