Sunday, April 5, 2026
HomeTop Newsदत्तात्रय साळुंखे यांचे निधन ;जावलीत कोरोना बळींचा आकडा ५३ वर

दत्तात्रय साळुंखे यांचे निधन ;जावलीत कोरोना बळींचा आकडा ५३ वर

जावळी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय साळुंके यांचं दुःखद निधन गेली चार दिवस सातारा येथे कोरोना उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक पवार यांचे ते खंदे समर्थक होते जावळी तालुक्यातील मोरावळे या गावांमध्ये जन्मलेले स्वतःचा रिक्षा व्यवसाय करत साताऱ्यामध्ये सुरुवात केली त्यांनी मोरावळे गावचे पंधरा वर्ष सरपंचपद भूषवून गावामध्ये विकास सेवा सोसायटी चे स्थापना करून त्याचे चेअरमन होते त्याच बरोबर सातारा जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक मालक संघ याचे चे सरचिटणीस होते संपूर्ण जावळी तालुक्यामध्ये अत्यंत साधा आणि उमदा असा एक नेता म्हणून त्यांची ओळख होती गेली कित्येक वर्ष पवार कुटुंबियांच्या बरोबर सर्व पातळीवर उघडपणे साथ देणारे असा त्यांचा नावलौकिक होता सतत हसमुख कुणालाही न दुखवणारे असं व्यक्तिमत्व साळुंखे यांचं होतं संपूर्ण जावळी तालुक्यावर दुःखाची कुराड कोसळली आहे सर्व स्थरातून त्यांच्याबद्दल शोक व्यक्त होत आहे

एकूण – १९१५, डिस्चार्ज १७१९, बळी ५३ ,अँक्टिव्ह १४४

जावलीत रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात शिंदेवाडी, कुडाळ व गवडी या गावात प्रत्येकी एक कोरोना पाँझिटीव्ह असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. आज पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page