
सूर्यकांत जोशी कुडाळ -9421214450
आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण आणि धार्मिक विधीला काही शास्त्र आहे काही पद्धती आहेत. नवरात्रातील नऊ दिवसाच्या देवीची नावे ही वेगवेगळी आहेत. हल्ली नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या महिला मंडळ परिधान करताना दिसतात.त्याचप्रमाणे नवरात्रात कोणत्या दिवशी कोणत्या फुलांची माळ घटाला घालावी असेही शास्त्र आहे. ग्रामीण भागात घटाला कारळ्याच्या फुलाची फुलाची माळ घालण्याची प्रथा आहे काही ठिकाणी कारळे ऐवजी झेंडूची फुले वापरतात.परंतु कोणत्या दिवशी कोणत्या फुलांची माळ घालायची असे हे शास्त्रात मध्ये लिहिलेले आहे परंतु अज्ञानामुळे आजपर्यंत नजरेआड राहिलेले शास्त्र पुढील प्रमाणे आहे.
*शैलपुत्री (पहिला दिवस)*
या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते.
*ब्रह्मचारिणी (दुसरा दिवस)*
या दिवशी अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते.
*चंद्रघंटा (तिसरा दिवस) :-*
या दिवशी निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ फुलाची माळ अर्पण केली जाते.
*कुष्मांडा (चौथा दिवस) :-*
या दिवशी केशरी अथवा भगवी फुले, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुलांची माळ अर्पण केली जाते.
*स्कंदमाता (पाचवा दिवस) :-*
या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते.
*कात्यायनी (सहावा दिवस) :-*
या दिवशी देवी कात्यायनीची पूजा होते. कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते.
*कालरात्री (सातवा दिवस) :-*
या दिवशी झेंडू किंवा नारिंगीची फुल्यांची माळ अर्पण केली जाते.
*महागौरी (आठवा दिवस):-*
या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते.
*सिद्धिदात्री (नववा दिवस):-*
या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करून नवरात्र संपते. कुंकुमार्चन करतात. या दिवशी सर्व प्रकारच्या व रंगाच्या फुलांची माळ घालावी अशी प्रथा काही ठिकाणी आहे.