Sunday, April 5, 2026
HomeTop Newsनवरात्र घटस्थापना विधी (पुराणोक्त मंत्रांसहित) असा करा. मंत्रोच्चारासह  पूजा विधी केल्याने आपणास...

नवरात्र घटस्थापना विधी (पुराणोक्त मंत्रांसहित) असा करा. मंत्रोच्चारासह  पूजा विधी केल्याने आपणास आत्मिक समाधान निश्चित मिळेल.

????

कोणतीही पूजा म्हटलं की धार्मिक श्रद्धा या असतातच. या पूजे दिवशी आपले मन आणि बाह्य वातावरण अत्यंत शुद्ध व पवित्र आणि धार्मिक बनते याच्या जोडीला जर विधियुक्त पूजा कशी करावी हे समजले आणि त्याप्रमाणे केले तर त्याचे आत्मिक समाधान मिळणारच यासाठी घटस्थापना मंत्रा सहित कशी करावी हे देत आहे.
नवरात्रातील प्रथम दिनी (प्रथमेच्या दिवशी) घटस्थापना केली जाते. घटस्थापना म्हणजेच देवीचा साक्षात वास मानला जातो. खाली शास्त्रोक्त पद्धती व मंत्र देत आहे:

पूजेसाठी साहित्य

कलश (पितळेचा/तांब्याचा), स्वच्छ पाणी , हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, नाणे, आंब्याची पाने (५),
नारळ (लाल वस्त्र गुंडाळून शेंदूर लावलेला)

सप्तधान्य (जव, गहू, मूग इ.) पेरण्यासाठी माती. फुलांची माळ, पानांची माळ खोबरे वाटी  बेल दुर्वा फुले फळे गुळ खोबरे खडीसाखर विड्याची पाने इत्यादी

???? घटस्थापना विधी क्रम

घटस्थापने पूर्वी आपले घर आणि ज्या ठिकाणी देव प्रतिष्ठापना करणार आहोत ती जागा स्वच्छ करावी. देव्हारा व देव स्वच्छ करून घ्यावेत. देवघर सुशोभित करावे. कारण हे आपण जो दीप नऊ दिवस ठेवणार आहोत तो दीप समय योग्य ठिकाणी ठेवावी शक्यतो उजव्या हाताला आग्नेय कोपऱ्यात असावी. दीपप्रजलित करावा. नेहमीप्रमाणे देवघरातील इतर देवांची पूजा करून घ्यावी. आपण ज्या देवाचे नवरात्र करणार आहोत त्याच सोबतच आपले कुलदैवत ग्रामदैवत यांचे टाक अथवा मूर्ती विड्याच्या पानावर ठेवाव्यात या दिवशी विड्याची पाने देठ देवाकडे न करता आपल्याकडे करून त्यावर देव प्रतिष्ठापना करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे.


प्रारंभी देवघरातील गणपतीच्या मूर्तीची अथवा गणपती प्रित्यर्थ एक सुपारी मांडावी. देवापुढे आपले कुलदैवत आणि ग्रामदैवत यांच्या नावाने दोन पाने त्यावर नाणी व सुपारी ठेवावी. या पानाच्या वेळेवर आपल्या कुलदैवता आणि ग्रामदैवता यांचे स्मरण करून आवाहनाच्या  अक्षदा व्हाव्यात.  विड्यावर हळद कुंकू अक्षदा वाहणे. “श्री कुलदैवता, ग्रामदेवता, स्थान देवता आदी कृपाप्रसाद सिद्यर्थ हरिद्राम कुंकूम समर्पयामी असा मंत्र म्हणावा .”
यानंतर गणपती, शंख व घंटा  पाणी,पंचामृत, गंध पूजा करावी. गणपतीचे स्मरण व प्रार्थना करावी.” वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा “

१. भूमिपूजन (जागा शुद्ध करणे)

ज्या ठिकाणी पूजा करायची आहे, ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी व पाणी शिंपडून शुद्ध करावे.

मंत्र म्हणावा –

ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ।
यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ॥

२. अंकुरारोपण

ताट/मडक्यात माती भरून सप्तधान्य पेरा.

पेरताना म्हणावे –


ॐ पृथिव्यै नमः ।

३. कलश स्थापना

कलशात पाणी भरून त्यात तांदूळ, सुपारी/नाणे टाका.

वर आंब्याची पाने ठेवा.

नारळावर शेंदूर, कुंकू लावून लाल वस्त्र गुंडाळून ठेवावा.


मंत्र –

ॐ कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः ।
मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥
कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ।
ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदोऽथ अथर्वणः ॥
अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशांबु समाश्रिताः ॥
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥

(यानंतर कलश देवतेचे ध्यान करावे.)




४. देवीचे आवाहन

घटासमोर लाल वस्त्र अंथरून त्यावर देवीची प्रतिमा किंवा फोटो ठेवा.

देवीला आवाहन करून मंत्र म्हणा –


ॐ दुर्गायै नमः ।
ॐ महिषासुरमर्दिन्यै नमः ।
ॐ सरस्वत्यै नमः ।
ॐ लक्ष्म्यै नमः ।

५. पूजन व आरती

हळद-कुंकू, फुले अर्पण करा.

दिवा, अगरबत्ती पेटवा.

दुर्गा स्तोत्र, सप्तशतीचा पाठ किंवा “जय देवी दुर्गे” अशी प्रार्थना करावी.


आरती मंत्र –

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥


६. नवरात्र काळात

रोज सकाळ-संध्याकाळ देवीला दिवा लावावा.

फुले, नैवेद्य अर्पण करून आरती करावी.

शक्य असल्यास “दुर्गासप्तशती” मधील काही अध्याय वाचावेत.


७. विसर्जन (दसऱ्याच्या दिवशी)

नवरात्र संपल्यावर देवीला नैवेद्य अर्पण करून घटातील पाणी व अंकुर प्रवाहात सोडावे.किंवा शेतात विसर्जन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page