कुडाळ ता. २७ : यामध्ये नाभिक समाजाचा केशकर्तनालय व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करणे बाबत तसेच कोरोना महामारी च्या लाटेत केलेल्या टाळेबंदी मुळे नाभिक समाजाला आर्थिक मदत देऊन कोरोनामुळे निराधार झालेल्या कुटुंबांचे शासन स्तरावरून पालकत्व स्वीकारण्याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष विजय सपकाळ यांनी भावनिक पत्राद्वारे कळकळीची विनंती केली आहे.
पत्रामध्ये म्हटले आहे, प्रिय साहेब आपणास अंतकरणापासून अभिवादन आणि आपण करत असलेल्या उल्लेखनीय कामास शुभेच्छा.आपण अतिशय प्रामाणिकपणे मानवतेच्या कल्याणासाठी अहोरात्र विविध उपाययोजना व मदत कार्य करीत आहात. आज या महामारी मुळे संपूर्ण मानवजात अडचणीत आली आहे. यामध्ये हातावर पोट असलेला कामगार व कारागीर वर्ग हतबल झाला आहे. त्यामध्ये नाभिक समाजाचा प्रमुख व्यवसाय सलुन आहे हा पूर्णपणे बंद असल्याने समाजातील अनेक कुटुंबांची उपासमार सुरू आहे. जवळजवळ संपूर्ण नाभिक समाजाच आर्थिक अडचणीत आला आहे.
मानवतेची स्वच्छता व सुंदरता हा समाज परंपरेनुसार सेवावृत्तीने करत आहे परंतु स्वच्छता सेवक आज सलून व्यवसाय संपूर्णपणे बंद असल्याने जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काम केले तरी कोरोना संसर्गाचा धोका आहे आणि नाही केले तर उपाशी राहून मृत्यु अशा विवंचनेत समाज आज जगत आहे.
त्यामुळे साहेब, हा व्यवसाय टिकवण्याबरोबर संरक्षित करणे आपल्या हातात आहे आणि तो तुम्हीच करू शकता, परंतु सद्यस्थितीत कोरूना रोग संसर्ग व त्यानंतर बुरशीजन्य म्युकरमायकोसिचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. तोही कोरोणारुग्ण व त्यातून बरे झालेल्यांना अधिक आहे. मधुमेह रक्तदाब असणाऱ्यांना तर हा धोका जास्त असल्याचा तज्ञांचा अहवाल आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक माणसाची स्वच्छता महत्त्वपूर्ण आहे, ही स्वच्छता करण्याचे काम सलून कारागीर करत असतो तोही मोठा धोका पत्करून. आपली पारंपरिक सेवा वृती आणि पोटाची भूक भागवण्यासाठीच. तरीही मायबाप सरकार आपले याकडे दुर्लक्ष का ? यामुळे साहेब हा व्यवसाय टिकवण्याबरोबर संरक्षित करणे आपल्या हातात आहे आणि ते तुम्हीच करू शकता यासाठी आपणाकडून आमच्या काही माफक अपेक्षा आहेत. यामध्ये आता तरी हा सलुन व्यवसाय मेडिकल डॉक्टर व इतर जीवनावश्यक क्षेत्राप्रमाणे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून प्रत्येक सलून व्यवसायिकांना 50 लाखांचे विमा संरक्षण देण्याचा तातडीने निर्णय घ्यावा. या लॉकडांऊनमध्ये आपण जाहीर केलेल्या हाता वरच्या पोटाच्या व्यवसायामध्ये सर्व सलुन व्यावसायिकांचा समावेश करावा . प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्याकडे प्रत्येक सलुन व्यवसाय धारकांच्या नोंदी आहेत जेणेकरून त्यांना काहीतरी आर्थिक मदत देवून उपहासमारीतून काही प्रमाणात का होईना मदत मिळेल. ज्यांची शासकीय मालमत्तेमध्ये सलून दुकाने आहेत त्यांची टाळेबंदी च्या काळातील भाडे व वीज बिल माफ करावे हे आपल्याच हातात आहे. मायबाप सरकार ज्या सलून व्यवसायिकांची खाजगी मालकीच्या जागेत दुकाने आहेत त्यांची वीज बिले माफ करून ,घराचे भाडे ,दुकान भाडे यासाठी किमान प्रति महिना दहा हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच दुकान खरेदी खरेदीसाठी व व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज माफ करण्यात यावे, त्याचबरोबर खाजगी फायनान्स तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे त्यांचे व्याज माफ करून कर्जफेडीसाठी पाच महिन्यानंतर हप्ते सुरू करावेत, कोरोना मध्ये अनेक कुटुंब प्रमुखाचे तसेच घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले आहे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या निराधार कुटुंबीयांना कोणत्याही कागदपत्रा विना किमान प्रति महिना 2000 ते 5000 पेन्शन योजना सुरू करावी. त्यांच्या मुलांचे शिक्षण तसेच कुटुंबीयांच्या आरोग्य सेवा मोफत कराव्यात. त्यांच्यावर असणारी कर्ज माफ करावीत. माथाडी कामगारांसाठी ज्याप्रमाणे स्वतंत्र बोर्ड आहे तसाच सलून व्यवसायिक व कारागीर बोर्डाची स्थापना करण्यात यावी त्या अंतर्गत सर्व सलुन व्यवसायिक व कारागिरांची शासन दरबारी नोंदणी करून त्यांचा त्यांना कामगार कायदा अंतर्गत मिळणारे लाभ द्यावेत .कृषी दुकानदारांसाठी ज्याप्रमाणे अठरा 18 वर्षावरील सर्वांना प्राधान्याने लसीकरणाचे परिपत्रक काढले आहे त्याप्रमाणे अठरा वर्षापुढील सर्व सलुन व्यावसायिकांना प्राधान्याने लक्ष देणे बाबत शासन स्तरावरून निर्णय घेवून परीपत्रक काढावे, कोरोना मध्ये निधन झालेल्या निराधार विधवा महिलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमुसार सरकारी, सहकारी भरतीमध्ये प्राधान्य देऊन त्यांच्या साठी जागा राखीव ठेवून त्यांना भरती करावे अशा मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. तसेच
सर्व मानव जात आज कोरोना महामारीच्या साथीमुळे भरडलेली आहे. त्यामध्ये नाभिक समाजाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळे मायबाप सरकार या वेळेस आपण या नाभिक समाजाचा मदतीपासून वंचित ठेवू नये ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि नम्र विनंती आहे.आपण ज्या वेळेला टाळेबंदी उठवणार आहात त्यावेळी सर्व व्यवसायाबरोबर सलून व्यवसाय ही सुरू करण्यास प्राधान्याने परवानगी द्यावी अन्यथा नाभिक समाजाचे जगणे मृत्युप्राय होईल . या पापाचे धनी मायबाप सरकार आपण होऊ नये एवढीच माफक अपेक्षा. साहेब आपणाकडून आमच्या या अखेरच्या अपेक्षा आहेत. तुमची ही मदत व निर्णय समाज सदैव स्मरणात ठेवेल. असेही या पत्रात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी म्हटले आहे.
यामध्ये सोबत आयकार्ड फोटो विजय सपकाळ यांचा वापरावा . तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो वापरावा
