Thursday, February 19, 2026
HomeTop Newsना. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली कुडाळ गटावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व : जयश्री गिरी व...

ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली कुडाळ गटावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व : जयश्री गिरी व सुहास गिरी  यांचा जबरदस्त  करिष्मा


सूर्यकांत जोशी कुडाळ – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कुडाळ गटावर भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले  वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या शांत,संयमी, समाजशील व नम्र स्वभाव असे व्यक्तिमत्व असणाऱ्या गिरी दाम्पत्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत कुडाळ गटातील मतदारांनी त्यांना विक्रमी मताने विजयी केले. या निवडणुकीत जयश्री गिरी सुहास गिरी व सौरभ शिंदे यांनी एकमेकाला विश्वासात घेत सांघिक पणे डावपेच आखात कुठे गटात विजयाचा करिष्मा केला कुडाळ गटातील हा विजय नामदार शिवेंद्रराजे भोसले यांना सन्मान जनक आहे.  


              निवडणूक जाहीर झाल्यानंतर कुडाळ गटांमध्ये असणारी गट तट व राजकीय समीकरणे यामुळे उमेदवारी जाहीर करण्याबाबत संभ्रम होता अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी पहाटेपर्यंत उमेदवारी देण्यावरून सुरुची वर खलबते सुरू होतील अगदी शेवटच्या क्षणी पक्षहिताला महत्त्व देत आणि विजयाचे मेरिट पाहून  कुडाळ गटासाठी जयश्री गिरी, कुडाळ गणासाठी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे व सायगाव गणातून चारुशीला विवेक पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व निवड समितीने या गटांमध्ये घेतलेला उमेदवारी निवडीचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि योग्य घेतल्याचे आज निकालानंतर स्पष्ट झाले.


             उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गट आणि गणांमध्ये प्रचंड रुसवे फुगवे होते परंतु नाराज इच्छुकांची समजूत काढण्यात नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सभापती सुहास गिरी व सौरभ शिंदे यांना  यश आले. सुहास गिरी व जयश्री गिरी यांनी यापूर्वी जावली पंचायत समितीचे सभापतीपद कारकीर्दीत केलेली कामे आणि लोकांशी ठेवलेले जिव्हाळ्याचे संबंध या निवडणुकीत अतिशय उपयुक्त ठरले विशेषतः जयश्री गिरी यांच्याबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात आदर व प्रेम दिसून आले प्रचारादरम्यान सुद्धा गिरी दांपत्याने कोणताही भडकपणा आणला नाही. सुहास गिरी यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या त्या ठिकाणी अत्यंत शांत संयमी व नम्र भाषा वापरले विरोधकांवरही त्यांनी टीका करणे टाळले. त्यांनी केवळ लोकांशी जपलेल्या नात्यांना उजाळा दिला. जयश्री गिरी यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत नम्रपणे फक्त विनंती केली आणि त्याचवेळी मतदार अगदी त्यांना ठाम विश्वास देताना दिसून आले त्या ठिकाणीच त्यांचा विजय निश्चित झालेला होता आणि केंद्रात व राज्यात असणारे भाजपाचे शासन आणि नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे दमदार नेतृत्व व  गिरी दांपत्याच्या बाबतीत असणाऱ्या विश्वास आणि चांगुलपणाचा फायदा गट व गणातील उमेदवारांना सुद्धा चांगले मताधिक्य मिळण्यासाठी झाला अशा प्रतिक्रिया आता समाजातून उमटत आहेत.
       जावली पंचायत समितीच्या यशस्वी कारभारानंतर जयश्री गिरी यांना जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळाली हे त्यांच्यासाठी राजकारणातील प्रगतीचा टप्पा मानला जातो. राजकारणाच्या शाळेत  यशस्वी होऊन सुद्धा पुन्हा त्याच सभागृहात जाणे म्हणजे पास होऊन पुन्हा त्याच वर्गात बसल्याप्रमाणे मानले जाते. गिरी यांना तालुक्याच्या सभागृहा नंतर आज जिल्ह्याच्या सभागृहात बसण्याची संधी मिळणार आहे किंबहुना जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचे संधी त्यांना प्राप्त झाली आहे हे जावली तालुक्यातील जनतेला अभिमानास्पद असे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page