Monday, April 6, 2026
HomeTop Newsनिवडणुकी पुरताच नाही तर विकासासाठी जावलीत येणार आ. शिंदे

निवडणुकी पुरताच नाही तर विकासासाठी जावलीत येणार आ. शिंदे

   जावली तालुक्यात निवडणुकी पुरताच नव्हे तर विकास करण्यासाठी येत राहणार अशी खोचक टिप्पणी आ.शशिकांत शिंदे यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात  केली. एकूणच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी  निवडणुकीने जावली तालुक्यातील वातावरण तापू लागले आहे.

             दोन दिवसांपूर्वी सर्जापूर येथे झालेल्या कार्यक्रमात आ.शिवेंद्रसिंह राजेंनी निवडणुकी पुरते तालुक्यात येणारा पासून सावध रहावे अशी टीका केली होती त्यावर आ.शिंदे यांनी  हा सूचक इशारा दिला .आपल्यावर ग्रामदैवत पिंपळेश्वरांचे कृपाशीर्वाद तर आहेतच.त्याच बरोबर आदरणीय शरद पवार साहेबांचे आशिर्वाद आहेत.त्यामुळे कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद आहे.

        जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी वरीष्ठ पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे आ. शिंदे म्हणाले.दरम्यान तालुक्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आपणास घेरण्याची तयारी सुरू असल्याबाबत पञकारानी विचारले असता तशी वेळ आलीच तर संघर्ष आपल्या रक्तात असल्याचे आ.शिंदे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page