कुडाळ -येथील बहुचर्चित पिंपळबन मधील युवा सदस्य कु. अथर्व व पायल जितेंद्र पवार , स्वराज पवार , गौरव पवार यांनी सध्याच्या वातावरणामध्ये नैसर्गिक संगोपन आणि संवर्धनाचे महत्त्व डोळ्यासमोर ठेवले . नैसर्गिक साधनसंपत्ती , झाडे , पाने, फुले इत्यादींच्या पासून घरगुती गणेशोत्सव सजावट करण्याचा निर्णय घेतला . पिंपळबन उद्यानाचा उद्देश समोर ठेवून देखावा करण्यास सुरुवात केली . मोकळ्या वातावरणात, डोंगरदऱ्यांची निर्मिती करून गणपतीची मुर्ती स्थापन केली . त्याच बरोबर सोबतीला शंभर टक्के ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळाच्या झाडाचा देखावा करण्यात आला. सोबतच गौरी बसवताना आपला राष्ट्रीय पक्षी मोराची प्रतिकृती करून मोरावर बसलेल्या सुंदर गौरींची स्थापना केली . त्याच बरोबर गणेशोत्सवादरम्यान भेटीस येणाऱ्या महिला वर्ग व इतर गणेशभक्तांना नैसर्गिक समतोल राखण्याचे फलक निर्माण करुन आवाहन करण्यात आले .
ही संपूर्ण सजावट करताना टाकाऊ पदार्थ, कागद , कार्डशिट , बारदाना इत्यादी वस्तूंचा वापर करून घरीच पेंटिंग करण्यात आले.
त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
नैसर्गिक संगोपनाचा संदेश देत कुडाळ मध्ये साकारला इको फ्रेंडली गणेशोत्सव
- Advertisment -

