HomeTop Newsपाचवड मेढा रोडवर डंपर मोटरसायकलची धडक : मोटर सायकल स्वार गंभीर जखमी:...

पाचवड मेढा रोडवर डंपर मोटरसायकलची धडक : मोटर सायकल स्वार गंभीर जखमी: अपघातास कारणीभूत डंपर चालकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कुडाळ- पाचवड मेढा रोडवर म्हसवे फाट्या जवळच्या वळणावर डंपरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात निष्काळजीपणे डंपर चालवल्याप्रकरणी डंपर चालकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6/4/25 रोजी दुपारी दीडच्या सुमारास म्हसवे तालुका जावली येथील सुनील धर्मु पिसाळ वय 56 हे आपल्या मोटार सायकल नं. MH11 AX5706 वरून पाचवड येथून औषध घेऊन घरी येत होते. या दरम्यान मौजे सरताळे गावचे हद्दीत म्हसवे फाटा येथे कॉर्नर वरील रोडवर समोरून येणारा अशोक लेलँड कंपनीचा पिवळ्या रंगाचा डंपर क्रमांक एम एच 11 डी. डी़7276 ने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल वरील सुनील पिसाळ यांच्या डोक्याला व उजव्या हाता पायाला गंभीर दुखापत होऊन जखमी झाले. सदरचा अपघात हा डंपर चालक मोहित नंदकुमार बोराटे वय 25 व्यवसाय ड्रायव्हर राहणार लिंब गोवे, तालुका जिल्हा सातारा यांनी त्यांच्या निष्काळजीपणाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवल्यानेच झाले असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात मेढा पोलीस ठाणे गु.र.नं व कलम -* 62/2024 BNS व मोटार वाहन कायदा कलम 281,125(a), 125(b), 324(4) प्रमाने संबंधित डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे सहा. पोलीस उप निरीक्षक शिंगटे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular