सूर्यकांत जोशी कुडाळ – दिवसेंदिवस कुडाळ चे पिंपळबन अधिक लोकप्रिय होत आहे.समाजाच्या विविध स्तरातुन या सामाजहितैशी उपक्रमाला मदत केली जात आहे.पिंपळबन शेजारीच असणार्या मंडल कृषि अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पिंपळबनच्या पुढील कामकाजासाठी पाच हजार एक रुपये पिंपळबन समितीकडे सुपूर्द केले.
*इथल्याच मातीत जन्मलेल्या, मातीवर मनापासून प्रेम करणाऱ्या, आणि या मातीशी नाळ जोडलेल्या असंख्य देणगीदारांच्या मुळे पिंपळबनचे स्वप्न साकार होत आहे .कुडाळ मध्ये लहान मुलांसाठी फायबरची खेळ उपकरणे व व्यायाम साहित्य बसविण्याचे काम सुरू आहे . सोबतच आवश्यक ठिकाणी बांधकाम विषयक कामे सुरू आहेत .
सातत्याने आपलेपणातून होत असलेल्या सर्वांचे सहकार्यामुळे कोरोना महामारी मध्ये देखील कामकाज वेगाने सुरू आहे.या काही समाजाच्या सर्वस्तरातून होणारी मदत आणि मार्गदर्शन प्रेरणादायी आहे.
????☘️ आपलं पिंपळबन कुडाळ☘️????