
सूर्यकांत जोशी कुडाळ – मेढा पोलीस ठाणे नेमणुकीचे पोलीस नाईक लंकेश धरमसिंग पराडके यांची सातारा जिल्हा पोलीस दल ते नंदुरबार जिल्हा पोलिस दलात विनंती ने बदली झालेने त्यांचा निरोप समारंभ मेढा पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष चामे यांच्या हस्ते संपन्न झाला.
सदर निरोप समारंभ प्रसंगी पोलीस ठाण्यातील एक शांत संयमी प्रामाणिक आणि शिस्तप्रिय सोबती आपल्या मूळ जिल्ह्यात बदलून जात असल्याने पोलीस कर्मचारी भाऊक झाले होते. तसेच त्यांचे प्रति श्री संतोष चामे साहेब आपले मनोगत व्यक्त करताना पराडके यांनी जावली तालुक्यात प्रामाणिक पणे बजावलेल्या प्रामाणिक कर्तव्याचे कौतुक केले . त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सदरचा निरोप समारंभ कार्यक्रम मेढा पोलीस ठाणे येथे संपन्न झालेला आहे.
