HomeTop Newsपोलीस पाटील संघटनेच्या जावली तालुका अध्यक्षपदी सुहास भोसले यांची बिनविरोध निवड :

पोलीस पाटील संघटनेच्या जावली तालुका अध्यक्षपदी सुहास भोसले यांची बिनविरोध निवड :

कुडाळ -महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या जावली तालुका अध्यक्षपदी श्री सुहास भोसले (खर्शी तर्फ कुडाळ) यांची एकमताने निवड करण्यात आली . यावेळी उपाअध्यक्ष म्हणून श्री संतोष भिलारे (शेते) व श्री धनाजी सपकाळ (बामनोली), तर सचिव म्हणून श्री तुषार जुनघरे, यांची निवड करण्यात आली तसेच सदस्य म्हणून, श्री एकनाथ सुतारा कुसुंबी, सौ.प्रियांका गायकवाड मोरघर, श्री ज्ञानेश्वर सावंत भामगर, श्री भिमराव परिहार बिभवी, श्री बाजीराव सुर्वे डांगरे घर, यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सुहास भोसले यांच्या सच्च्या नेतृत्वगुणांमुळे संघटना अधिक बळकट व एकसंघ होईल, जावळी तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या अडचणी सोडवून अनेकांना सहकार्य केल्याने आपल्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular