Monday, April 6, 2026
HomeTop Newsपोषन आहारात चक्क प्लास्टिक तांदुळाचे वितरण :पुरवठादारावर कारवाईची मागणी

पोषन आहारात चक्क प्लास्टिक तांदुळाचे वितरण :पुरवठादारावर कारवाईची मागणी

सूर्यकांत जोशी कुडाळ – महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी विद्यार्थ्यांना व गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषन आहारात चक्क प्लास्टिक तांदुळाचे वितरण करण्यात आले आहे.या तांदुळाच्या भात खाल्याने मुलांना पोट दुखीचा ञास होत आहे.लहान मुलांच्या जीवाशी खेळणार्या पुरवठादार ठेकेदारा विरोधात  पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

             कुडाळ येथील इंदिरानगर मधील महिलांनी भातामधील काही तांदूळ शिजत नसल्याचे तसेच चावले जात नसल्याचे ही कुडाळ चे माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली.भाता मधील तांदुळ फायबर सदृश्य प्लास्टिक चे असल्याचे दिसून येत आहे.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी.तसेच निकृष्ट दर्जाचे तांदूळ व  डाळींची तपासणी करून पुरवठादारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

               याबाबत महिलांनी संबंधित अंगणवाडी सेविका यांना दोन दिवसांपूर्वी याबाबत माहिती दिली होती.त्यानुसार अंगणवाडी सेविका यांनी महिला व बालकल्याण च्या वरीष्ठ अधिकारी यांना कळवले होते.परंतु याबाबत अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page