Thursday, February 19, 2026
HomeTop Newsप्रतापगड कारखाना कामगार संस्थापक सहकार पॅनलच्या पाठीशी ठाम

प्रतापगड कारखाना कामगार संस्थापक सहकार पॅनलच्या पाठीशी ठाम

सूर्यकांत जोशी कुडाळ – प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणी पासुन संचालक मंडळाने कामगारांच्या हिताचेच धोरण राबवले आहे.तसेच कामगारांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ  खंबीरपणे पाठीशी उभे राहिले त्यामुळे आम्ही सर्व कामगार  चेअरपर्सन श्रीमती सुनेत्रा शिंदे व आपल्या संचालक मंडळाच्या कायम सोबत आहोत.या निवडणुकीत संस्थापक सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करु अशी ग्वाही प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांच्यासह  सर्व कामगारांनी आयोजित एका बैठकीत दिली.

               यावेळी कारखान्याच्या चेअरपर्सन श्रीमती सुनेत्रा शिंदे, उपसभापती सौरभ शिंदे व संचालक उपस्थित होते.

              कारखाना उभारणीसाठी विरोधकांचे कोणतेही योगदान नाही.कारखाना आर्थिक अडचणीत सापडल्या नंतर आम्हा कामगारांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला.या संदर्भात कारखाना चालविण्यास घेतलेल्या प्रत्येक प्रशासनाला कामगारांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सौरभ शिंदे व संचालक मंडळाने पुढाकार घेतला.गेली चार वर्षे कारखाना बंद आहे.परंतू या दरम्यान कामगारांना  कायम करण्यात येऊन वेजबोर्ड लागू करुन एक प्रकारे संरक्षण दिले.यि संचालक मंडळाने कामगारांना नेहमीच सन्मान व न्याय दिला आहे.विरोधक प्रचारासाठी कामगारांचे नाव घेऊन दिशाभूल करत आहेत.परंतू त्यांच्या खोट्या प्रचाराला कोणीही भूलणार नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page