HomeTop Newsप्रतापगड कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खोडा घातल्यास योग्य धडा शिकवू -...

प्रतापगड कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खोडा घातल्यास योग्य धडा शिकवू – संस्थापक पॅनल

कुडाळ – प्रतापगड सहकारी साखर कारखाना ही जावळी तालुक्याची अस्मिता असून कारखान्याची येऊ घातलेली निवडणुक  बिनविरोध व्हावी अशी तालुक्यातील सर्वच शेतकरी , सभासद, व तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधींची इच्छा आहे. त्याप्रमाणे तालुक्यातील कोणताही पक्ष, गटतट न ठेवता सर्वांना विचारात घेऊन बिनविरोध प्रक्रियेसाठी सर्वांचे प्रयत्न सूरू आहेत, या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन संस्थापक पँनेलच्या वतीने करण्यात येत आहे. जावली तालुक्यातील शेतकरी सभासद व कामगारांच्या हक्काचा असलेला हा कारखाना येणाऱ्या पुढील हंगामात स्वबळावर जोमाने सूरू करणार येणार आहे.अशी ग्वाही संस्थापक पॅनल च्या वतीने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.निवडणुक बिनविरोध प्रक्रियेत  खोडा घालण्याचा प्रयत्न कोणी केल्यास विरोधकांना धडा शिकवू असा इशारा या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आला आहे.

                 प्रतापगड कारखानाच्या निवडणुकीपेक्षा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सूरू करणे ही खरी मोठी लढाई आहे. हे वास्तव सर्वांनी आधी स्विकारणे गरजेचे आहे, कारखाना सहकारात टिकवण्यासाठी वाट्टेल ती किमत मोजावी लागली तरी चालेल .

हे सहकार मंदिर खाजगी करणात जाऊ देणार नाही व तो सभासदांच्या मालकीचा राहील ह्याच हेतुने मा.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड-किसनवीर मध्ये १६ वर्षांसाठी करार करण्यात आला. गेली ८ वर्ष कारखाना हा किसनवीरच्या ताब्यात आहे. त्यातील ५ वर्ष किसनवीर ने कारखाना चालवला मात्र सध्या किसनवीर कारखाना हा स्वताच अडचणीत असल्याने तोही बंद आहे त्यामूळे  मागिल ३ वर्ष प्रतापगडकारखाना हा सुद्धा बंद आहे.

प्रतापगड कारखाना संचालक मंडळ कारखाना सूरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे . परंतु काही कायदेशीर बाबींची अडचणी दुर झाल्याशिवाय कारखाना सूरू होत नाही हे सभासदांसमोर आम्ही स्पष्टपणे मांडत आहोत, कायदेशीर मार्गाने करार संपुष्टात आणुन हा कारखाना स्वबळावर चालु करण्यासाठी प्रयत्न चालु झालेले आहेत व त्या प्रक्रियेला मा.ना.शरद पवार साहेब, मा.ना.आजित दादा पवार, सहकारमंत्री मा. बाळासाहेब पाटील, विधानपरिषद सभापती मा.रामराजे नाईक निंबाळकर, मा.आ.शिवेंद्रराजे भोसले, मा.आ.शशिकांतजी शिंदे  अशा अनेक नेत्यांचे सहकार्य मिळत असून किसनवीरच्या व्यवस्थापनाकडून  योग्य तो प्रतिसाद याकामी मिळत आहे, त्यामूळे सगळ्यांच्या पाठबळावर निश्चीतच प्रतापगड कारखाना हा पुढील हंगामात स्वबळावर ऊभा राहणार याची ग्वाही यानिमित्ताने देत आहोत, कारखान्याची येऊ घातलेली निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी संस्थापक पँनेलला जाहीर पाठिंबा यापुर्वींच दिलेला आहे, त्याबददल सर्वांचेच आम्ही मनापासून ऋणी आहोत, कारखाना बिनविरोध व्हावा व कारखान्यावर अतिरीक्त खर्चाचा बोजा पडु नये ह्याच कारणासाठी आपण बिनविरोध ची विनंती यानिमित्ताने करत आहोत.असेही या पत्रकात नमूद केले आहे.

मात्र ह्या विनंतीचा गैरफायदा घेऊन जाणीवपुर्वक संस्था खड्ड्यात घालण्याच्या उदीष्टाने जर निवडणुक लावण्यासाठी काही बिगर सभासद मंडळी आतुर असतील तर ही निवडणुक कै.मा.आ.लालसिंगरावजी शिंदे काका व कै.मा.राजेंद्रजी शिंदे भैय्या यांचे विचार जपण्यासाठी व ह्या संस्था सहकारात टिकुन राहण्यासाठी निवडणुक संस्थापक पॅनल च्या माध्यमातुन ताकदीने लढवुन काका-भैय्यांचे विचार जपण्याचे काम आम्ही नक्कीच सक्षमतेने करू आणि सभासदांवर लादलेल्या ह्या निवडणुकीत अशा अपप्रवृत्तींना प्रतापगडच्याच नव्हे तर भविष्यातील येणाऱ्या सर्व निवडणुकीतून त्यांना कायमचे हद्दपार करू एवढी राजकीय धमक व ताकद आमच्यात आहे हे त्यांनी विसरू नये, शेतकरी सभासदांच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे घेत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत याचा अर्थ आम्ही निवडणुक लढवू शकत नाही असा चूकूनही गैरसमज कोणी करून घेऊ नये, प्रतापगड कारखानाचे विद्यमान संस्थापक पॅनल हे सातारा-जावली विधानसभेचे आमदार मा.आ.शिवेंद्रराजे भोसले, विधानपरीषद सदस्य मा.आ.शशिकांतजी शिंदे, माजी आ.सदाभाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्यातील सर्व शेतकरी सभासदांना सोबत घेऊन आगामी निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ. व विरोधकांना त्यांची जागा नक्की दाखवू. निवडणुकी आधीच संस्थापक पँनेलच्या महीला प्रतिनीधीच्या दोन संचालक ह्या बिनविरोध निवडुन आल्या आहेत त्यामूळे विजयाची सुरूवात संस्थापक पँनेलने आधीच केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular