सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील सर्वात मोठा सहकारी कृषि औद्योगिक प्रकल्प असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून आवश्यकता भासल्यास दि.१३ मार्चला मतदान होणार आहे.तर १४ मार्चला मतमोजणी होणार आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग, पुणे धनंजय डोईफोडे यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी द्वारा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा यांच्या कार्यालयातून प्रतापगड सहकारी साखर कारखाना लि.सोनगांव करंदोशी,या.जावली या संस्थेची दि.४/२/२०२२ रोजी अधिसूचना जारी केली आहे.
संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.यामध्ये व्यक्ती व ऊस सभासद गटातून एकूण १५ जागा आहेत.यामध्ये गट नं. १ कुडाळ,गट नं.२ खर्शी सायगांव,गट नं.३ हुमगांव,गट नं. ४ मेढा,गट नं.५ महाबळेश्वर अशा पाच गटातून संचालक मंडळाच्या प्रत्येकी ३ जागा आहेत.उत्पादक संस्था,बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था १, महिला राखीव २, अनुसूचित जाती व जमाती राखीव १, विमुक्त जाती व भटक्या जमाती राखीव १,इतर मागास प्रवर्ग १ अशा एकूण २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे निवडणूक प्रसिद्ध करणे – दि.४/०२/२२, नामनिर्देशन पत्र विक्री व स्विकृती दि.४/०२/२२ ते १०/०२/२२, नामनिर्देशन पत्र यादी प्रसिद्धी दि.४/०२/२२ ते १०/०२ /२२ दु.३.३० नंतर, नामनिर्देशन पत्र छाननी दि.११/०२/२२ रोजी सकाळी ११ वा.विधीमान्य नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्धी दि.१४/०२/२२, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख दि.१४/०२/२२ ते २८/०२/२२ सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत.निवडणुक लावणार्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी व चिन्ह वाटप दि.२/०३/२२ रोजी दुपारी १३.३० वाजता.आवश्यक असल्यास मतदान दि.१३/०३/२२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत.मतमोजणी दि.१४/०३/२२ रोजी सकाळी ८ पासून सुरू होणार आहे व मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मतमोजणी स्थळ नंतर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.