Thursday, February 19, 2026
HomeTop Newsबामणोली गावाने दिलेले प्रेम व साथ अविस्मरणीय - सौरभ शिंदे : जयश्री...

बामणोली गावाने दिलेले प्रेम व साथ अविस्मरणीय – सौरभ शिंदे : जयश्री गिरी व सौरभ शिंदे यांना बामनोली गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार


कुडाळ- माजी आमदार लालसिंगराव शिंदे व प्रतापगड कारखान्याचे संस्थापक चेअरमन राजेंद्रजी शिंदे यांचे बामणोली गावावर अमाप प्रेम होते.  ग्रामस्थांनी काका व भैय्याना भरभरून साथ दिली त्यानंतर आज हे ग्रामस्थ तेवढ्याच ताकदीने आपल्या पाठीशी उभे आहेत या गावातील ग्रामस्थांकडून मिळणारे प्रेम व साथ ही अविस्मरणीय आहे या गावच्या विकासासाठी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदैव कटिबद्ध राहील असे प्रतिपादन सौरभ शिंदे यांनी केले.         
       भारतीय जनता पक्षाच्या कुडाळ गटातील अधिकृत उमेदवार जयश्री गिरी व कुडाळ गणाचे उमेदवार सौरभ शिंदे यांच्या प्रचारार्थ बामनोली येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सभापती सुहास गिरी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे जावली शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे कुडाळ सोसायटीच्या चेअरमन मालोजीराव शिंदे बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे यांच्यासह बामनोली ग्रामस्थ उपस्थित होते.
       स्व.काका व स्व.भैय्यांच्या पावलावर पाऊल टाकून सौरभ शिंदे यांनी सुद्धा सहकार सांभाळत असताना सामाजिक व राजकीय क्षेत्रात मध्ये आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत बामणोली ग्रामस्थ सौरभ शिंदे यांना विक्रमी मताधिक्य देतील असा विश्वास बामणोली ग्रामस्थांच्या वतीने किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिंदुराव तरडे आप्पा यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page