Sunday, April 5, 2026
HomeTop Newsभाजपा प्रदेशाध्यक्षांचे मानकुमरे पाॅईंटवर स्वागत

भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मानकुमरे पाॅईंटवर स्वागत

सूर्यकांत जोशी कुडाळ – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे जावलीचा वसंतगड तथा मानकुमरे पाॅईंटवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी स्वागत केले.मानकुमरे पाॅंईंटवर उभारण्यात आलेला अश्वारूढ पुतळा आणि भगवा ध्वज लांबुन  दिसल्यावर या ठिकाणी आपले पणाची जाणीव झाली होती असे सांगून त्यांनी मानकुमरे यांचे कौतुक केले.तसेच एक दिवस येथे जेवायला येणार असा शब्द दिला.

       यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मच्छिंद्र क्षिरसागर, बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सरचिटणीस विठ्ठल देशपांडे, नगरसेवक विकास देशपांडे , तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page