Monday, April 6, 2026
HomeTop Newsभारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून मेढा येथे चक्का जाम आंदोलन

भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून मेढा येथे चक्का जाम आंदोलन

कुडाळ दि.२६-  भारतीय जनता पार्टीचे वतीने ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणेसाठी राज्यभर चक्का आंदोलने करण्यात आली.

मेढा येथील बाजारचौकात सर्व भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करत,राज्य सरकार चा निषेध करत हे आंदोलन पार पाडले.

यावेळी मेढा नगरीचे नगराध्यक्ष श्री पांडुरंग जवळ (बापू),भाजपा नगरसेवक श्री विकास देशपांडे,भाजपा महीला मोर्चा अध्यक्ष सौ गीता लोखंडे यांनी तीव्र शब्दात राज्य सरकारचा निषेध करत मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनात युवानेते श्री संतोषजी वारागडे,ओबीसी अध्यक्ष श्री प्रकाश सुतार,जिल्हा चिटणिस श्री विठ्ठल देशपांडे,नगरसेवक श्री शशिकांतजी गुरव,श्री रामचंद्र सावंत,श्री सुरेश ननावरे,श्री सुरेशबुवा जवळ,श्री प्रकाश अवघडे, श्री धनंजय खटावकर,श्री मालोजी तांबे,श्री संजय वेंदे,श्री अशोक जवळ,श्री अनिलजी बेंद्रे,श्री सदाशीव जवळ,श्री विजय शिंदे,महीला अध्यक्ष सौ.वैशाली सावंत,सौ.बनसोड, सौ.धनवडे,सौ.सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहे.

हे प्रशासकिय नियम पाळुन,कोणताही अनुचित प्रकार न करता शांततेत पार पडले.दोनी बाजू वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page