Thursday, February 19, 2026
HomeTop Newsभैरवनाथ मंडळाने आँक्सिजन मशीन रुपी केलेली मदत लाख मोलाची - शरद पाटील

भैरवनाथ मंडळाने आँक्सिजन मशीन रुपी केलेली मदत लाख मोलाची – शरद पाटील

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील मेढा येथील भैरवनाथ मंडळाने आपल्या सामाजिक आणि लोकपयोगी कार्याची परंपरा कायम राखत सध्या कोरोना बाधितांसाठी अत्यावश्यक असलेली आँक्सिजन मशीन उपलब्ध करून दिली आहे.या निमित्ताने मंडळाने आपल्या सामाजिक बांधिलकीची  परंपरा अखंड सुरू ठेवली आहे . या मशिनमुळे ऑक्सिजन मिळून अनेक रुग्णांचा जीव वाचणार असून मंडळाने केलेली मदत लाख मोलाची आहे.असे प्रतिपादन तहसीलदार शरदपाटील यांनी केले.

        जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे उपचारासाठी बेड मिळत नाहीत. ऑक्सिजन विना अनेक मृत्यू होत आहेत जावली तालुक्यातही परिस्थिती बिकट झाली आहे जिवलग मित्र परिवार ग्रुपच्या माध्यमातून मी एक जबाबदार जावलीकर हे अभियान सुरू करण्यात आले आहे .     

         प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मा. शरद पाटील साहेब व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी जनतेला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी साहित्य रुपात मदत करण्याचे आवाहन केले होते .त्या आवाहनाला प्रतिसाद देत मेढा शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भैरवनाथ युवा क्रीडा मंडळाच्या वतीने एक ऑक्सिजन मशीन मा . तहसीलदार सो यांच्याकडे आज मंगळवारी सुपुर्द करण्यात आले.

         मंडळाचे संस्थापक मा पांडुरंग जवळ यांच्या सूचनेवरून अध्यक्ष मा . बबनराव जवळ,सचिव शशिकांत गुरव, खजिनदार चंद्रशेखर गाढवे व पदाधिकार्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला भैरवनाथ मंडळाने आपल्या सामाजिक आणि लोकपयोगी कार्याची परंपरा या निमित्ताने अखंड सुरू ठेवली आहे या मशिनमुळे ऑक्सिजन मिळून अनेक रुग्णांचा जीव वाचणार असून मंडळाने केलेली मदत लाख मोलाची आहे.   

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page