Sunday, April 5, 2026
HomeTop Newsमहाबँकेची केळघर शाखा स्थलांतरित करु नये.ग्राहकांचे निवेदन

महाबँकेची केळघर शाखा स्थलांतरित करु नये.ग्राहकांचे निवेदन

ना:बाळासाहेब पाटील यांना निवेदन देताना विजयराव मोकाशी, एकनाथ ओंबळे, रवींद्र सल्लक, बजरंग चौ धरी, प्रीतम पार्टे आदी

केळघर, ता :२०:केवळ व्यवसाय कमी आहे हे कारण पुढे करून केळघर येथे गेल्या ३८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेचे मेढा येथे स्थलांतर करण्याचा घाट बँकेच्या प्रशासनाने घेतला असून केळघर विभागातील सर्वसामान्य सभासदांना वाऱ्यावर सोडून मेढा येथे बँकेचे स्थलांतर करण्यापेक्षा बँकेने व्यवसाय वाढवून बँक आहे तिथेच ठेवावी अशी मागणी परिसरातील ग्रामपंचायतींनी ,शेतकरी व व्यापारी संघटना,सभासद यांच्या वतीनेबँकेच्या सातारा येथील विभागीय कार्यालयास केलेल्या लेखी निवेदनात केली असून केळघर येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेचे स्थलांतर करु नये यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनाही सभासदांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .यावेळी पालकमंत्री श्री. पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बँक स्थलांतर होऊ नये यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही निवेदन देताना दिली आहे.
सातारा येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देताना बोंडार वाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, सरपंच परिषद तालुका अध्यक्ष बजरंग चौधरी ,केळघरचे सरपंच रविंद्र सल्लक,उद्योजक नारायण शेठ सुर्वे,प्रीतम पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बँकेच्या प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केळघर येथे १९८२ पासून बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शाखा सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही शाखा तोट्यात असल्याचे कारण दाखवून बँकेच्या प्रशासनाने ही शाखा बंद करून तिचे स्थलांतर मेढा येथे करण्याचा निर्णय सभासदांना विश्वासात न घेता एकतर्फी पणे घेतला आहे. या बँकेच्या कार्यक्षेत्रात परिसरातील ३० ते ३२ गावे येतात. मेढ्यापासून केळघर पर्यंत ही एकमेव राष्ट्रीयीकृत बँक असून बँकेत १४ कोटीच्या ठेवी असताना बँकेकडून तितका कर्जपुरवठा न होता अत्यल्प कर्जपुरवठा केला आहे. पुरेसा कर्जपुरवठा होत नसल्याने येथील शेतकरी ,व्यावसायिक नाईलाजाने इतर बँकांकडे वळत आहेत. व्यवसाय कमी आहे हे कारण सांगितले जात असले तरी बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यवसाय वाढी साठी पुरेसे प्रयत्न न केल्याने व्यवसाय समाधानकारक होत नसून याला सामान्य सभासद जबाबदार नसून बँक जबाबदार आहे. ठेवींच्या तुलनेत कर्जव्यवहार कमी असल्याने तोट्यात वाढ होते. पात्र सभासदांना कर्जपुरवठा होत नाही असे सभासदांचे म्हणणे आहे.
सध्या धामणेर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या चारपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे तसेच बों डारवडी धरणाचे काम पूर्ण झाल्यास येथे पर्यटन, तसेच लघु उद्योगांना चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विभागातील बहुसंख्य सभासद सभासद हे अल्प उत्पन्न गटातील असून विविध शासकीय योजनांचा लाभ या शाखेकडून मिळतात. मेढा येथे बँकेचे स्थलांतर झाल्यास विभागांतील 30 ते 32 गावातील सभासदांना व्यवहारासाठी मेढा येथे जावे लागेल त्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होणार आहे. त्यामुळे बँकेने आपली सेवा सुधारून केळघर येथे व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करावेत, खातेदार, शेतकरी यांना विश्वासात न घेता परस्पर बँकेचे स्थलांतर झाल्यास विभागातील सभासद जनआंदोलन उभारून बँकेचे स्थलांतर रद्द करावे यासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न करतील असे शेवटी निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page