HomeTop Newsमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने महाराष्ट्र...

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धा स्पर्धा पार पडणार 2022 :शरद पवार


आज गोविंदबाग बारामती येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी व जिल्हा तालीम संघ साताऱ्याची कार्यकारणी यांची संयुक्त बैठक होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी सातारा येथे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पैलवानांना व संघटनांना एकत्रित सामावून घेऊन यशस्वीरित्या पार पाडणार आहेत.
पवार साहेबांनी तातडीने बारामती येथे दोन्ही संस्थांच्या कार्यकारणी च्या सदस्यांना आमंत्रित करून वरील निर्णय दिला अनेक दिवस काही चुकीच्या गोष्टी व गैरसमजुती मधून घडत असलेले प्रकार याच्या वरती श्री दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली पडदा पडला आदरणीय पवार साहेब यांनी सदर स्पर्धा होत असताना त्याला येणारा खर्च सुमारे दोन कोटी रुपये आहे 1963 साली कै यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई श्रीरंग आप्पा जाधव व साहेबराव पवार भाऊ यांनी शाहू कलामंदिर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पाडलेली आज तब्बल 60 वर्षांनंतर साहेबराव पवार भाऊ यांनी ही स्पर्धा सातारा शहरांमध्ये पार पाडण्यासाठी नव्या उमेदीने कार्यकारणीचे सर्व संचालक व तालीम संघ स्पर्धा पार पाडणार आहे राज्यभरातून सुमारे अकराशे मल्ल पंच कोच टीम मॅनेजर व वस्ताद मंडळी व आजी-माजी कुस्तीगीर मिळून सुमारे दीड हजार लोक पाच दिवस सातारा शहरांमध्ये मुक्कामी राहणार आहेत दिनांक 4 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम येथे सातारा येथे स्पर्धा पार पडणार आहेत आज झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार साहेब कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते सरचिटणीस बाळासाहेब लांडगे सर्जेराव शिंदे ललित लांडगे भरत मेकाले अमृता मामा भोसले दयानंद भक्त तसेच जिल्हा तालीम संघाचे दीपक पवार पैलवान बापूसाहेब लोखंडे विकास गुंडगे माणिक पवार जीवन कापले चंद्रकांत सूळ आबा सूळ रुस्तुम तांबोळी वैभव फडतरे संदीप साळुंखे बलभीम शिंगरे कांता पैलवान यशवंत चव्हाणव जिल्हा तालीम संघाचे सचिव सुधीर पवार उपस्थित होते
स्वतः शरद पवार साहेब दिनांक 25 ते 27 च्या दरम्यान तालीम संघ सातारा येथे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची संयुक्त अधिवेशनासाठी मिटींग लावणार आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular