Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsमहाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेच्या प्रदेश प्रवक्ते व प्रसिद्धी प्रमुख पदी...

महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेच्या प्रदेश प्रवक्ते व प्रसिद्धी प्रमुख पदी नारायण जाधव यांची निवड …

नारायण जाधव यांचा सत्कार करताना सर्जेराव मोहिते , बाळासाहेब पवार , मधुकर मोहिते , आर टी मोहिते , लालासाहेब मोहिते आदी .


केळघर / प्रतिनिधी .
महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष श्री सर्जेराव मोहिते यांचे सह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्याचे युवा अध्यक्ष श्री नारायण जाधव (भाऊ) यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रवक्ते व प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली .
केळघर ( नांदगणे ) ता. जावली गावचे सुपुत्र नारायण जाधव हे गेले अनेक वर्षे सामाजीक ,शैक्षणीक, पत्रकारीता क्षेत्राबरोबरच विविध संस्थेत कार्यरत आहेत नुकतेच त्यांना को रोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले आहे . त्यांची सामाजीक तळमळ पाहूण त्यांना संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रवक्ते व प्रसिद्धी प्रमुख पदी बिनविरोध निवड केली आहे. महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटना पूर्ण पणे त्यांचे पाठीशी असुन त्यांनी समाजासाठी भरीव कार्य करावे असे प्रतिपादन राज्य अध्यक्ष श्री सर्जेराव मोहिते यांनी केले .
यावेळी राज्य कार्यकारनी सदस्य श्री आर टी . मोहिते , सातारा जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब पवार , सचिव लालासाहेब मोहिते , खजिनदार श्री मधुकर बापु मोहिते , सदस्य श्री आबासाहेब मोहिते , प्रदिप मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी नुतन प्रदेश प्रवक्ते व प्रसिद्धीप्रमुख नारायण जाधव म्हणाले महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शना खाली महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर राहुन संघटना वाढीसाठी व समाज हितासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून संघटनेने दिलेली जबाबदारी प्रमाणीकपणे पार पाडून समाजासाठी आहोरात्र काम करणार आहे .
त्यांचे या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेचे मा अध्यक्ष श्री दिनकरराव मोहिते , सरचिटनिस बबनराव मोहिते यांचेसह संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यां बरोबरच सातारा जिल्हाचे पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील , गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई , खा. श्रीमंत उदयनराजे भोसले , सिक्कीमचे मा . राज्यपाल व खा . श्रीनिवास पाटील , सातारा – जावलीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ,आ . शशिकांत शिदे ,मा .आ . सदाभाऊ सपकाळ ,जि .प सदस्या सौ अर्चनाताई रांजणे , प्रा. संजुकुमार जाधव ,डॉ भगवानराव मोहिते , जावली तालुका पत्रकार संघ यांचेसह विविध सामाजीक, शैक्षणीक व राजकिय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page