
ओझरे तालुका जावळी येथील रक्तदान शिबिराला भेट दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवर (छाया– अजित जगताप, मेढा)
(अजित जगताप)
मेढा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात ओझरे या ठिकाणी वार्षिक यात्रा व महाशिवरात्र निमित्त रक्तदान शिबिर झाले. गेली नऊ वर्ष सामाजिक जाणिवेतून वेण्णा फाउंडेशन ही सामाजिक संस्था रक्तदान आयोजित करत आहे.
जावळी तालुक्यामध्ये ओझरे गावच्या वेण्णा फाउंडेशन म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणारी सामाजिक संस्था आहे. नाते माणुसकीचे जपावे तसेच शैक्षणिक कार्यामध्ये सरळ हस्ते सहकार्य करावे. असे या ठिकाणचे ग्रामस्थ मनोभावे मानतात.
गावचं गाव पण टिकून ठेवण्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. आणि या संस्काराची शिकवण देणाऱ्या सातारा जिल्हा परिषद ओझरे शाळेची स्वच्छता व स्थानिक विद्यार्थ्यांना ज्ञान अमृत मिळावे. या उद्देशाने सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेची भव्य इमारत सुद्धा उभी राहिलेली आहे. विविध शैक्षणिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडवली आहे. या क्रांतीचे सर्वच साक्षीदार आहेत. विद्यार्थी व गुरुजन आणि ग्रामस्थ यांचा त्रिवेणी संगम पाहण्यास मिळाला आहे. महाशिवरात्र निमित्त गजर भक्तीचा.. सोहळा रक्तदानाचा त्याचबरोबर वार्षिक यात्रेची आरती व आराधना पुजाअर्चा आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने झाला आहे. तरुण पिढी रक्तदात्यांच्या योगदानामुळे गरजूवंतांना रक्ताचा पुरवठा होत आहे. त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून ग्रामस्थांच्या नेत्राची काळजी घेण्यात आलेली आहे. ग्रामस्थांची एकजूट अखंड राहिलेले आहे. त्याचे कौतुक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले आहे.
ओझरे गावचे सरपंच व उपसरपंच अजित मर्ढेकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी घोरपडे, युवा उद्योजक सुनील मर्ढेकर, अशोक लकडे गुरुजी, प्रमोद इंगुळकर, मच्छिंद्र कदम, वसंत लकडे, भरत लकडे, प्रताप मर्ढेकर, रामदास धर्माधिकारी यांच्यासह ग्रामस्थांनी ही मोलाचे सहकार्य केले आहे. या सर्वांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनापासून कौतुक केले आहे. ओझरे गावच्या विकासासाठी नेहमीच ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले असल्याचा उल्लेख अभिमानाने ग्रामस्थांनी केला आहे.
—————————-